मुरबाड, ता. २६ (वार्ताहर)ः ठाणे जिल्हा परिषदेतील पदवीधर शिक्षकांची पदोन्नती झालेली नाही. त्यामुळे उच्च प्राथमिक शाळांतील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, विज्ञान तसेच समाजशास्त्र विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा वानवा असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षकांची २०१४ पासून पदोन्नती झालेली नाही. २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विज्ञान व भाषा विषय शिक्षक भरण्याचा प्रस्ताव तयार केला. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही पदोन्नती प्रक्रिया व्हावी, यासाठी शिक्षकांनी प्रस्ताव बनविण्यासाठी प्रशासनाला मदत केली; मात्र सामान्य प्रशासन विभागाने ऐनवेळी त्रुटी काढत प्रस्ताव परत पाठवला होता. त्यानंतर लागलेल्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली. अशातच लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर प्रशासनाने सहा महिन्यांपासून नव्याने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे; मात्र आजतागायत पदोन्नती प्रक्रियेला मुहूर्त सापडत नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.