मुंबई

वर्षभरात पाच हजार सुखरूप प्रसूती

CD

पनवेल, ता. २६ (बातमीदार) : पनवेल तालुक्यात महापालिका आणि खासगी रुग्णालयात मागील वर्षात चार हजार ९६९ महिलांची सुखरूप प्रसूती झाली. यामधील एका वर्षाच्या आत अवघी पाच अर्भके मृत झाली आणि एका मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पनवेल तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा पवार यांनी दिली.
जागतिक आरोग्य दिन नुकताच पार पडला. ‘माता आणि नवजात बालके यांचे आरोग्य’ ही यंदाची संकल्पना आहे. या माध्यमातून नवजात बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासोबतच माता व जन्मजात बालमृत्यू दर कमी करण्याचे प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने केले जात आहेत. पनवेल पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने मातामृत्यू रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील गर्भवतींमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी आशा सेविका व परिचारिकांना प्रशिक्षणही दिले जात आहे. मातामृत्यू होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये महिलेला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणे, अनेकदा गर्भपात झालेला असणे, प्रीॲक्ल्मेशिया, प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव ही त्यातील काही कारणे आहेत. मातामृत्यू रोखण्यासाठी धोकादायक गर्भधारणा ओळखून त्याची कल्पना संबंधित गर्भवतीला देणे आवश्यक असते. त्यासाठी आशा सेविका व परिचारिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर आपल्या परिसरातील गर्भवतींची नोंद ठेवणे, त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी जागरूक करणे, त्यांची गर्भधारणा धोकादायक असेल तर पुढे काय करायला हवे, यासाठी मार्गदर्शन करणे ही जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते.
-----------------
गर्भवतींमध्ये अनेकदा पोषणाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनसारख्या घटकांचीही कमतरता असते. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी गर्भवतींनी रुग्णालयात येणे गरजेचे आहे. गर्भवतींची नऊ महिन्यांत किमान चार वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. अनेकदा प्रसूतीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळेही मातामृत्यू होतात. हे टाळण्यासाठी गर्भधारणेनंतर पहिल्या महिन्यापासूनच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अपर्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT