मुंबई

प्रीमियर २

CD

भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारी रहस्याची उत्तम गुंफण

मराठी चित्रपट : देवमाणूस

संतोष भिंगार्डे
‘लव फिल्‍म्‍स’ने हिंदीमध्ये उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. हिंदीमधील एक प्रख्यात बॅनर म्हणून त्याची ख्याती आहे. आता हेच बॅनर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम आणि दर्जेदार चित्रपट बनविण्याच्या उद्देशाने उतरले आहे. या बॅनरचा पहिलावहिला मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ आता प्रदर्शित झाला आहे. उत्तम कथाबीज आणि त्याची योग्य अशी बांधणी, तेजस प्रभा विजय देऊसकरचे नेटके व कल्पक दिग्दर्शन, नेहा शितोळने बांधलेली भक्कम पटकथा, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा... शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असा भावनाप्रधान चित्रपट आहे.
एका देवमाणसाची ही कथा हळूहळू पुढे सरकत असताना त्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकेक टर्न आणि ट्विस्ट येतात. त्यामुळे चित्रपट चांगलाच गुंतवून ठेवणारा झाला आहे. केशवभाऊ (महेश मांजरेकर) आणि त्यांची पत्नी लक्ष्मी (रेणुका शहाणे) हे मध्यमवर्गीय जोडपे. त्यांची त्या परिसरात एक सभ्य आणि सुसंस्कृत जोडपे अशी ओळख असते. केशवभाऊ हा सेवानिवृत्त शिक्षक असतो. त्यांचा मुलगा परदेशात गेलेला असतो. मुलाच्या शिक्षणासाठी केशवभाऊंनी आपल्या घरावर कर्ज काढलेले असते. ज्याच्याकडून त्यांनी कर्ज घेतलेले असते तो अनैतिक धंदे करणारा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस दिलीप (सिद्धार्थ बोडके) असतो. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तो वारंवार केशवभाऊंच्या घरी येऊन त्यांना नाहक त्रास देत असतो. त्यांना नेहमीच अपमानीत करीत असतो. शांत आणि संयमशील स्वभावाचे असलेले केशवभाऊ निमूटपणे त्याचा हा त्रास सहन करीत असतात. तरीही त्याच्या या त्रासाला कंटाळून ते त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी एक वेळ पोलिस ठाण्यात जातात; परंतु त्याची फारशी दखल घेतली जात नाही; मात्र अशातच एके दिवशी परिस्थिती अशी निर्माण होते, की केशवभाऊंच्या संयमाचा बांध फुटतो आणि कथानकाला वेगळे वळण मिळते.
हा चित्रपट सन २०२२ मध्ये आलेल्या ‘वध’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे. त्या चित्रपटामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकरने या हिंदी चित्रपटाचा रिमेक करताना त्या कथेला मराठमोळा साज उत्तम चढविलेला आहे. एका फक्कड लावणीबरोबरच अन्य मराठमोळ्या घटकांचा छान समावेश या कथानकामध्ये करण्यात आला आहे. या कथानकाला चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न त्याने आपल्या परीने केला आहे. एक सेवानिवृत्त सरळ व साध्या स्वभावाचा शिक्षक, आर्थिक समस्येमुळे त्याला सहन करावा लागणारा त्रास, त्यानंतर त्याच्या सहनशीलतेचा होणारा अंत, त्यातून त्याच्या मनाची होणारी घालमेल... अशा केशवभाऊंच्या भूमिकेतील विविध छटा महेश मांजरेकर यांनी पडद्यावर छान टिपलेल्या आहेत. त्यांनी या भूमिकेला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री रेणुका शहाणेने लक्ष्मीची भूमिका उत्तमप्रकारे निभावली आहे. या दोन अनुभवी आणि महत्त्वपूर्ण कलाकारांबरोबरच सुबोध भावे आणि अभिजित खांडकेकर यांनीही आपापली भूमिका उत्तमप्रकारे साकारली आहे; परंतु विशेष कौतुक करावे लागेल ते सिद्धार्थ बोडकेचे. त्याने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे आणि ती लक्षवेधी अशीच झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्याच कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. चित्रपटातील सई ताम्हणकर हिच्यावर चित्रित झालेली लावणी झकास झाली आहे. त्याचबरोबर ‘पांडुरंग...’ हे गाणेदेखील गुणगुणावेसे झाले आहे. त्याबाबतीत संगीतकार रोहन रोहन यांचे कौतुक. सिनेमॅटोग्राफर अमेय चव्हाण यांचेही काम वाखाणण्याजोगे झाले आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स उत्कंठावर्धक असाच झाला आहे; मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे; पण मध्यांतरानंतर कथानक वेगळे वळण घेते आणि शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.
एकूणच नाट्यमय घटनांनी भरलेला, भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा आणि रहस्याची उत्तम गुंफण असलेला हा चित्रपट निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी आणलेला आहे.

- साडेतीन स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT