मुंबई

खासदार सुनील तटकरेंनी केली आंबेवाडी ते निवी कालव्याची पाहणी

CD

खासदार सुनील तटकरेंनी केली आंबेवाडी ते निवी कालव्याची पाहणी
रोहा, ता. २६ (बातमीदार) ः कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी ते निवी कालव्याची खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीदरम्यान शेतीला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचविले पाहिजे, अशी सूचना तटकरे यांनी संबंधित विभागाला दिली.
या परिसरातील शेतीसाठी कालव्याचे पाणी गरजेचे आहे. त्‍यामुळे कालव्याच्या दुरुस्ती कामांची पाहणी करावी व पाण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना कराव्यात, अशी मागणी बळीराजा फाउंडेशनच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत तटकरेंनी दुरुस्ती कामे पाहणी दौरा केला. अशोकनगर ते निवी भुवनेश्वरपर्यंतच्या कालव्याच्या विविध कामांची पाहणी केली. या वेळी कामाबद्दल पाटबंधारे प्रशासनाला सूचना केल्या. त्‍यानंतर काही काळात तिसे मुख्य मार्गातून कालव्याला पाणी सोडण्यात आले. कामाची माहिती घेत निवी हद्दीत शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्याच्या सूचनाही खा. तटकरेंनी कार्य अभियंता मिलिंद पवार यांना दिल्या. तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या कालव्यासंबंधी अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने दुरुस्ती कामेही मार्गी लावा, असे या वेळी तटकरे यांनी अधिकारीवर्गाला सांगितले. या वेळी बळीराजा फाउंडेशनसह कार्यकारी अभियंता मिलिंद पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस विजय मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, कार्याध्यक्ष समीर शेडगे, सरचिटणीस सुरेश मगर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भगत, सचिव दीपक भगतसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT