उत्तर प्रदेशातील युवा नेत्यावर
दुर्मिळ थॅलियमचा विषप्रयोग
मुंबईतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज; माहीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई, ता. २६ : उत्तर प्रदेशातील तरुण राजकीय नेते आणि समाजवादी छात्रभारतीचे माजी महासचिव आणि वाराणसीतील युवा नेते संदीपसिंग स्वर्णकार (वय ४१) यांच्यावर दुर्मिळ थॅलियमचा विषप्रयोग करण्यात आला आहे. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असून सिंग यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून माहीम पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शरीरात अत्यंत धिम्या गतीने भिनणाऱ्या थॅलियमच्या विषाचा (स्लो पॅायझनिंग) या नेत्यावर प्रयोग करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपल्या तक्रारीत केली आहे. २ मार्चला संदीप यांना सर्वप्रथम गुरूग्राम येथील मोदींच्या आणि ८ मार्चला दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांना तो जीबीएस सिंड्रोमने आजारी असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांच्यावर त्याप्रमाणे उपचार केले; मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. अखेर कुटुंबीयांनी संदीप यांना २७ मार्चला एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणले. येथे प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी संदीप यांच्यावर थॅलियम विषप्रयोग झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर विविध चाचण्यांमध्ये संदीपवर दीड महिन्यांपूर्वी हा विषप्रयोग झाल्याचे सिद्ध झाले. त्या पार्श्वभूमीवर माहीम पोलिस ठाण्यात या प्रकरणाची लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे. संदीप हे अखिलेश यादव आणि मेरठचे आमदार अतुल प्रधान यांचे विश्वासू मानले जातात. स्वतः अखिलेश यादव दूरध्वनीवर त्यांच्या प्रकृतीची सातत्याने विचारपूस करत आहेत.
--
२२ वर्षांपासून राजकारणी सक्रिय
उत्तर प्रदेशातील राजकारणात संदीप हे गेल्या २२ वर्षांपासून सक्रिय आहेत. काही वर्षांत समाजवादी पक्ष मजबूत करण्यासाठी ते प्रभावी व आक्रमकपणे काम करीत असल्याने राजकीय कारणावरून त्यांचा काटा काढण्यासाठी हा प्रयत्न केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांना थॅलियम मिळणे अशक्य असते. त्यामुळे विषप्रयोगामागे कुण्या बड्या व्यक्तीचा हात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
--
थॅलियम शरीरात असे पसरते...
थॅलियम अन्नातून शरीरात गेल्यानंतर लगेच त्या व्यक्तीचा त्वरित मृत्यू होत नाही. त्याचे विष हळूहळू शरीरावर परिणाम करते. सुरुवातीला डोकेदुखी, उलटी आणि जुलाब यांसारखी सामान्य लक्षणे दिसतात. त्यामुळे हे विष दिले गेले आहे, हे कुणालाही सहज समजत नाही. हळूहळू हे विष शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम करू लागते. सर्वात आधी याचा प्रभाव मज्जासंस्थेवर होतो. व्यक्तीची विचारशक्ती आणि आकलन क्षमता कमजोर होते. स्मरणशक्ती कमी होऊ लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.