मुंबई

सिडकोच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती

CD

सिडकोच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती

वाशी, ता. २६ (वार्ताहर) : वाशी येथील सेक्टर १९ एफमधील न्यू बॉम्बे मर्चंट्स कॉमन वेअरहाउस संस्थेला सिडकोने दिलेला भूखंड रद्द करून हा भूखंड निविदा काढून विक्रीस काढण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, व्यापाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

सिडकोने १९९८ साली साडेनऊ एकर क्षेत्रफळाचा भूखंड वाशी येथे न्यू बॉम्बे मर्चंट कॉमन वेअरहाउस या संस्थेला दिला होता. ८६२ व्यापाऱ्यांनी गोदाम व कार्यालयासाठी या भूखंडासाठी पैसे भरले होते, मात्र लीज प्रीमियमबाबत सिडको व व्यापारी संघटनांमध्ये वाद निर्माण झाला होता. नंतर अतिरिक्त २.८१ कोटी रुपये भरल्यानंतरही सिडकोने भूखंडासाठी ६४ कोटी रुपयांचा प्रीमियम भरण्याची मागणी केली. त्यामुळे संस्था न्यायालयात गेली. हा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असताना, सिडकोने भूखंडाचा ताबा घेऊन या भूखंडाच्या विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. सिडकोच्या या निर्णयाविरोधात संस्थेचे संचालक मोहन गुरनानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सिडकोला कंत्राट प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Yavatmal Diesel Supply : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ट्रॅक्टरच्या टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोल पंपांना थेट आदेश

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT