मुंबई

शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून हल्ला

CD

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : लादी पुसताना पडलेल्या पाण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. ही धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प ४मधील आशेळे पाडा परिसरात घडली. शहाजी कडू चाळमध्ये राहणाऱ्या अंकुश भोईटे या व्यक्तीवर शेजाऱ्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंकुश भोईटे यांच्या पत्नीने शनिवारी (ता. ३) घरासमोर लादी पुसताना थोडे पाणी रस्त्यावर पडले. त्यावरून शेजारी राहणाऱ्या छाया जाधव या महिलेसोबत वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि काही क्षणांतच छाया आणि सोनू नावाचा तरुण; तसेच अन्य काही व्यक्तींनी मिळून भोईटे कुटुंबावर हल्ला चढवला. या प्रकरणात अंकुश यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. घटनेनंतर भोईटे कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमी अंकुश यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून छाया, सोनू आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन भेटीतून काय निष्पन्न झाले? भारतासाठी आहे 'ही' गुड न्यूज

मोठी बातमी : Dewald Brevis ला नियमभंग करून ताफ्यात घेतले? R Ashwin च्या गौप्यस्फोटानंतर चेन्नई सुपर किंग्सचं स्पष्टीकरण

Wildlife Photography Career: निसर्गाचं जिवंत चित्र टिपायचंय? वाइल्डलाईफ फोटोग्राफीत करा करिअर!

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात

Jai Jawan Pathak: अनेक प्रयत्न कोसळले, पण अखेर उभा राहिला १० थरांचा इतिहास, कोकणनगरनंतर जय जवान पथकाची विजयी झेप!

SCROLL FOR NEXT