मुंबई

‘ट्रान्स हार्बर’ चार तास ठप्प

CD

‘ट्रान्स हार्बर’ चार तास ठप्प
ठाणे-ऐरोली पुलावर गर्डर झुकला; ६० हून अधिक फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मध्य रेल्वेच्या ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान नव्याने बसवण्यात आलेला गर्डर एका बाजूला झुकल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा शुक्रवारी (ता. ९) सकाळी चार तास पूर्णपणे ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सात वाजता या मार्गावरील वाहतूक थांबवली; ती दुपारी १२ वाजता पूर्ववत करण्यात आली; मात्र यामुळे तब्बल ६० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.
‘एमएमआरडीए’ने गुरुवारी (ता. ८) रात्री एक ते पहाटे चारदरम्यान ठाणे-ऐरोली पुलावर गर्डर बसवण्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले; मात्र सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गर्डर एका बाजूला झुकलेला आढळल्याने रेल्वे प्रशासनाने तत्काळ ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल- नेरूळ- वाशी ते ठाणे लोकल सेवा बंद केली. ‘एमएमआरडीए’ व रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा ब्लॉक घेऊन हा गर्डर दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. या अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. या प्रवाशांनी पर्याय म्हणून बसकडे मोर्चा वळवला. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे- वाशीदरम्यान १५, नेरूळ- ठाणे ५, पनवेल- ठाणे ६ आणि वाशी- ठाणेदरम्यान १५ अशा एकूण ४१ अतिरिक्त बस सोडण्यात आल्या.

लोकल १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने
चार तासांच्या खोळंब्यामुळे शुक्रवारी (ता. ९) ट्रान्स हार्बर मार्गावरील ६० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. हे गर्डर बसविण्याचे काम सकाळी सव्वा अकरा वाजता पूर्ण झाले; मात्र सेवा पूर्ववत होण्यासाठी दुपारचे १२ वाजले. त्यानंतरही दिवसभर या मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या, त्यामुळे प्रवाशांना दिवसभर त्रास सहन करावा लागला.

प्रवाशांना लेटमार्क; आर्थिक भुर्दंड
ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना या घटनेमुळे कार्यालयात वेळेत पोहोचता आले नाही. अनेकांना ‘लेटमार्क’ बसला असून काहींनी कार्यालयात पोहोचण्यासाठी खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सी अथवा कॅबचा पर्याय निवडला. परिणामी, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यातच अनेकांना पर्यायी मार्गांची माहिती नसल्याने ते स्थानकांवरच अडकून पडल्याचे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT