मुंबई

घणसोलीतील तरणतलावाला मुहूर्त मिळाला

CD

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : घणसोली सेंट्रल पार्क येथील जलतरण तलावाच्या लोकार्पणाला चार वर्षांनी अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी (ता. १३) जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. यासाठी प्रवेशाचे अर्ज शनिवारपासून (ता. १०) सुरू झाले असून, एकाच दिवसात तब्बल ३०० जणांनी अर्ज भरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
घणसोली येथील जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर त्याचे लोकार्पण करावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. पालिका प्रशासनाने जलतरण तलावाच्या डागडुजीसाठी अतिरिक्त ६२ लाख खर्च करून अद्ययावत जलतरण तलाव नागरिकांसाठी सज्ज केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून तलावाच्या डागडुजीचे काम पूर्ण करून तो खुला करावा, अशी मागणी केली होती.
घणसोली सेक्टर तीन येथील सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडून होता. तलावाची दुरवस्था होऊन आतील टाइल्स तुटल्या होत्या. तलावात पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्तीदेखील वाढली होती. नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून पंपाच्या साह्याने साचलेले पाणी उपसण्यात आले होते. जलतरण तलावाची दुरुस्ती करून तो खुला करावा, यासाठी अभिजित पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन डिसेंबर महिन्यात काम पूर्ण झाले आहे.
--------
३९ हजार चौमी क्षेत्रात सेन्ट्रल पार्क
नवी मुंबई महापालिकेने ३९ हजार १३५ चौरस मीटर क्षेत्रफळावर १७ कोटी ५० लाख खर्च करून भव्य सेन्ट्रल पार्कची उभारणी केली आहे. पंचमहाभूतांवर आधारित संकल्पनेनुसार हा पार्क विकसित केला आहे. या सेंट्रल पार्कमध्ये स्केटिंग रिक, जलतरण तलाव, मिनी फुटबॉल टर्फ सुविधा निर्माण केल्या असून, या ठिकाणी क्रीडा विभागाकडून प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
-------------
चुकीच्या कामामुळे क्रीडा विभागाने जलतरण तलावास मान्यता दिली नव्हती. त्यामुळे चार वर्षांपासून स्थापत्य विभागास नवीन निविदा काढण्यासाठी पाठपुरवठा चालू होता. त्याला यश आले असून, दीड वर्षापूर्वी स्थापत्य विभागाने तलावाच्या दुरुस्तीसाठी ६२ लाखांची निविदा काढली आणि हे बांधकाम डिसेंबर २०२४ला पूर्ण झाले.
- अभिजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Dahi Handi 2025 : जिथं जय जवान पथक कोसळलं, तिथंच कोकण नगर पथकानं रचला 10 थरांचा इतिहास; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनीही केलं कौतुक

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने होम लोन केले महाग

Irfan Pathan : धोनीने मला संघाबाहेर ठेवलं...! इरफान पठाणने सांगितला २००९ चा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने रचला २०२५ मधील पहिला १० थरांचा विश्वविक्रम

'आयुष्यात सगळंच अवघड होऊन बसलय' गोविंदाची पत्नी मंदिरात मोठमोठ्याने रडली, पण नक्की झालं काय?

SCROLL FOR NEXT