मुंबई

यशस्‍वी उपचारामुळे थॅलेसेमियाच्या रुग्णाला दिलासा

CD

यशस्‍वी उपचारामुळे थॅलेसेमियाच्या रुग्णाला दिलासा
दुर्मिळ अस्थिसंसर्गाचे निदान; विशिष्ट जंतूसंसर्गाचा परिणाम
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) ः कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात थॅलेसेमियाच्या रुग्णावर यशस्‍वी उपचार झाल्याने कुटुबीयांना दिलासा मिळाला आहे.
थॅलेसेमियाची रुग्ण असलेली १८ वर्षीय रचना शाह (नाव बदलले आहे) हिच्या डाव्या पायावर २०२० रोजी सांध्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यामुळे तिचा पाय कायमचा आखूड झाला होता. त्यामुळे तिला लंगडत चालावे लागत होते. काही काळाने रचना हिला भरपूर ताप येऊ लागला व श्वास घेण्यास अडचण होऊ लगली. दोनदा तोल जाऊन पडल्याने तिचे दोन्ही पाय व बाहू फ्रॅक्चर झाले. तिला आपल्या डाव्या पायावर उभे राहणे अशक्य झाले. या घटनांनी धास्तावलेल्या व त्यामागचे कारण शोधून काढण्यासाठी धावाधाव करणाऱ्या तिच्या पालकांनी पुढील पाच वर्षे तिला एका रुग्णालयामधून दुसऱ्या ठिकाणी नेले. या वेळी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. प्रत्येक वेळी डॉक्टरांना भेटल्यावर त्यांचा गोंधळ अधिकच वाढत होता, तपासणीत नवनव्या चाचण्यांची भर पडत होती आणि आजाराची कोणतीच सुस्पष्ट कल्पना न आल्याने कुटुंबीयांची मन:स्थिती असहाय बनली होती. दरम्यान, कल्याणमधील फोर्टीस रुग्णालयाला भेट देण्यात आली. फोर्टिस रुग्णालयामधील डॉ. स्वप्नील केणी (कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक) आणि डॉ. हमझा दलाल, कन्सल्टन्ट हिमॅटोलॉजी व यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीमने रचना हिला बरखोल्डेरिया स्युडोमॅली या रोगकारक जंतुमुळे होणारा ऑस्टिओमायलिटिस हा हाडांचा एक दुर्मिळ संसर्ग झाल्याचे निदान केले. या वेळी तिच्यावर रुग्णालयात यशस्‍वी उपचार करण्यात आले. आता तिची वेदनांपासून सुटका झाली आहे व आपली वैयक्तिक कामे ती पूर्वीप्रमाणे करणे तिला जमू लागले आहे. त्याच जागेवर किंवा शरीरात इतरत्र कुठेही पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने तिला तज्ज्ञांच्या मदतीने नियमितपणे देखरेख ठेवावी लागेल, असे डॉ. केणी या वेळी म्हणाले.
..............
रोगप्रतिकार यंत्रणेवर परिणाम
बरखोल्डेरिया स्युडोमॅली हा एक दुर्मिळ रोगकारक जंतू आहे, जो ऑस्टिओमायलिटिसचे कारण मानला जातो. तो भारताच्या उष्णकटिबंधीय भागात, विशेषत: तमिळनाडू व केरळमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. या जीवसंस्थेमध्ये एकावेळी अनेक भागांना संसर्गित करण्याची क्षमता असते, ज्यामुळे आजार सर्वत्र पसरतो व त्यातून सेप्टिसेमियाही होऊ शकतो. रचनासारख्या थॅलेसेमियाचा सामना करत असलेल्या रुग्णांच्या बाबतीत ही रोगप्रतिकार यंत्रणेला कमकुवत करणारी स्थिती ठरते व त्यासाठी एका टर्शियरी केअर संस्थेमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्स, हिमॅटोलॉजिस्ट्स, संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ, पॅथोलॉजिस्ट्स, मायक्रोबायोलॉजिस्ट्स आणि फिजिओथेरपिस्ट्स या सर्वांचा सहभाग असलेली एक मल्टीस्पेशालिटी कार्यपद्धती आवश्यक असते, ज्याच्या एकत्रित प्रयत्नांमुळे थॅलेसेमियाच्या रुग्णाला हाडांच्या जंतुसंसर्गासारख्या गुंतागुंतींना हाताळण्याच्या व वेदना न जाणवता प्रकृती पूर्ववत होण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या कामी मोठा आधार मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT