मुंबई

वाशी सेक्टर १२मध्ये आज मॉक ड्रिल

CD

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी आणि प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी ‘ऑपरेशन अभ्यास’ या मॉक ड्रिलचे आयोजन वाशी सेक्टर १२ येथील नीलसिद्धी टॉवर परिसरात मंगळवारी (ता. १३) दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. विविध आपत्ती यंत्रणा यात सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील व शहर अभियंता तथा मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष आरदवाड, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमेश पाटील यांच्या पुढाकारातून हे मॉक ड्रिल पार पडणार आहे. सर्व यंत्रणांनी या मॉक ड्रिलला गांभीर्याने घ्यावे. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पाडावी, मॉक ड्रिलच्या दरम्यान सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. यादरम्यान नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सेल्फी काढू नये आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, हे मॉक ड्रिल केवळ पूर्वतयारीचा भाग असून, कोणतीही खरी आपत्ती उद्‍भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे.
------------------
मॉक ड्रिलमध्ये होणारा घटनाक्रम
- प्रथम दुपारी ४ वाजता सायरन वाजणार.
- बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार.
- सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार.
- धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.
- संबंधित परिसरात शोधमोहीम घेऊन जखमी, अडकलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT