मुंबई

पावसाच्या पाण्यावरून दोन गटात हाणामारी

CD

पावसाच्या पाण्यावरून दोन गटांत हाणामारी
१० ते १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : पावसाच्या पाण्यावरून किरकोळ स्वरूपात झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना रविवारी (ता. ११) दिवा आगासन गावात घडली. या वेळी एका गटाने दुसऱ्या गटाला लाकडी दांडक्याने, दगडासह तलवारीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये फिर्यादी मदन पाटील यांच्या डोक्याला आणि छातीला दगड लागला असून, त्याचा मुलगा अंजिक्य यांच्या हातावर तलवारीने वार झाला आहे. तसेच त्यांचा पुतण्या प्रसाद याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी मुंब्रा १० ते १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिवा पूर्व आगासन गावातील मदन दतु पाटील (६६) हे रविवारी दुपारी कुटुंबासह घरात जेवण करत होते. त्याच वेळी खिडकीची काच फुटून एक दगड घरामध्ये आला म्हणून ते दरवाजाजवळ गेले. याचदरम्यान दशरथ म्हात्रे यांच्यासह इतरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांची कॉलर पकडून घराबाहेर काढले. त्या वेळी त्यांना वाचविण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा अंजिक्य, पुतण्या प्रसाद, मोठा भाऊ बळीराम, पुतण्या विराज आणि भाचे सागर तसेच तकदीर मढवी यांनाही लाकडी दांडक्याने, दगडाने तसेच तलवारीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत पाटील यांच्या डोक्यासह छातीला दुखापत झाली असून, त्यांचा मुलगा अंजिक्य याच्या उजव्या हाताच्या दंडावर तलवारीने वार झाल्याने त्याला दुखापत झाली आहे, तर त्यांचा पुतण्या प्रसाद याच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. याशिवाय इतरांनादेखील मारहाण करून दुखापत केल्याचे तकारीत म्हटले आहे. या वेळी घराबाहेर उभ्या असलेल्या तीन चारचाकी गाड्यांचेही नुकसान झाले. याप्रकरणी दशरथ म्हात्रे, विशाल म्हात्रे, धीरज म्हात्रे, विलास म्हात्रे, पिंट्या म्हात्रे, रमाकांत गायकवाड व इतर चार ते पाच अनोळखी पुरुष तसेच तीन ते चार अनोळखी महिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT