मुंबई

दहावीतही मुलींचाच डंका

CD

वाशी, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल यंदा महिनाभर आधी लागला आहे. मंगळवारी यंदाचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९३.८० टक्के लागला आहे; तर नवी मुंबईचा ९७.३२ टक्के निकाल लागला आहे. निकालात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून एकूण १५७ शाळांमधून १५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी १५ हजार ४६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १५ हजार ५० उत्तीर्ण झाले आहेत. यंदा परीक्षेला बसलेल्या मुलांची संख्या जरी अधिक असली तरी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी अधिक असल्याने यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. नवी मुंबईत ९८.०९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, ९६.६१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
--------------------
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात परीक्षा
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर मोबाईल आणि सायबर कॅफेमध्ये आपला निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना पुढील महिन्यात परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे आरएसएसशी मतभेद? संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, 'दोन्ही संघटना एकाच विचारसरणीच्या, पण...'

Whatsapp Call Schedule : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं कॉल शेड्यूल फीचर, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Irfan Pathan Interview : इरफान पठाणची IPL कॉमेंट्री टीममधून हकालपट्टी कुणामुळे झाली? विराट, रोहित नव्हे निघाला तिसराच...

Latest Maharashtra News Updates : चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी पावसामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान

'अस्वच्छता ही भारताची ओळख...' शंशाक केतकरचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाला...'आता कृपा करून...'

SCROLL FOR NEXT