भिवंडी, ता. १५ (बातमीदार): महापालिकेने कचरा संकलनाचा करार रद्द करून सुमारे १० महिने झाले आहेत, पण संबंधित ठेकेदाराला कचरा संकलनासाठी दिलेली १० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची दिलेली यंत्रसामग्री, वाहने परत घेण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे करण्यात आली आहे.
भिवंडी महापालिका प्रशासनाने सुमारे दोन वर्षांपूर्वी शहरातील कचरा उचलण्याचा ठेका आर अँड बी इन्फ्रा या कंपनीस दिला होता. पंतप्रधान स्वच्छता अभियानांतर्गत कोट्यवधी खर्चून पालिकेला मिळालेली ५० इंजिन वाहने, २३ आरसी मशीन, डम्पर, ट्रक दरमहा फक्त एक रुपयांना देण्यात आला होता. निविदेतील अटी-शर्तींनुसार कंत्राटदार वाहने परत करेल तेव्हा सर्व वाहने पूर्ण देखभालीनंतर दिलेल्या स्थितीत परत केली जातील, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये घसाई अथवा दुरुस्ती आकार लावलेला नव्हता. या स्थितीत आर अँड बी इन्फ्राचा करार १० महिन्यांपूर्वीच रद्द झाला. त्यामुळे ठेकेदाराने सर्व वाहने रस्त्याच्या कडेला आणि गोडाऊनमध्ये इकडे तिकडे वाहने उभी केली आहेत, पण महापालिकेने कंत्राटदाराला अद्याप १० कोटी रुपये दिलेले नाहीत. यामुळे भिवंडी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर अंभोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी पत्रातून केली आहे.
------------------------------------
अधिकाऱ्यांना अभय
महापालिका प्रशासनाने कंत्राटदारासह सहभागी असलेल्या कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या आरोग्य आणि वाहनविभागाचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात एफआयआर दाखल केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.