मुंबई

कोसळत्‍या धारांमध्ये टँकरच्या फेऱ्या

CD

कोसळत्‍या धारांमध्ये टँकरच्या फेऱ्या
खालापुरातील वाड्या-वस्‍त्यांत टँकरने पाणीपुरवठा

खालापूर, ता. १७ (बातमीदार) : आठवडाभरापासून दररोज सायंकाळी वादळी पाऊस येत आहे. असे असले तरी तालुक्‍यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. भर पावसात काही गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील जांबरुंग, जांबरुंग बौद्धवाडी आणि खरवई या तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय वावोशी, रानसई, ढेबेवाडी आणि गर्जेवाडी या आदिवासी वाड्यांमधूनही प्रशासनाकडे टँकरची मागणी करण्यात आली आहे.
बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी, चार मोठी धरणे, आठ पाझर तलाव एवढी मुबलक जलसंपदा असतानादेखील तालुक्यातील वाड्या-वस्‍त्‍या तहानलेल्‍या आहेत. यंदा खालापूर तालुक्यातील १३ गावे आणि २८ वाड्या टंचाईग्रस्‍त आहेत. २०२४-२५ वर्षात पाणीटंचाई निवारणासाठी २२ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वयाळ, कोपरी आंबेमाळवाडी, टेंभरीवाडी वावोशी गाव, चिलठण, खानाव, बीड खुर्द, नारंगी, जांबरुंग, खरवई, तळवली, गोरठण, केळवली, गोळेवाडी, रानसई आदिवासी वाडी, ढेबेवाडी बर्गेवाडी, बीड खुर्द आदिवासी वाडी, बीड खुर्द बौद्धवाडी, उंबरविरा ठाकूर वाडी, केळवली वाडी, परखंदे खालची वाडी, परखंदे धनगरवाडी, खैराट धनगरवाडा, वडविहीर कातकरवाडी, वावर्ले ठाकूर वाडी, पाली नरसरी, तीनघर ठाकूर वाडी, नारंगी दत्तवाडी, जांबरुंग बौद्धवाडी, माणिकनगर तळवली, टेंभरीवाडी, सारंग वाडी, कोपरी आंबेमाळवाडी, करंबेळी ठाकूर वाडी, खडईवाडीचा समावेश टंचाईग्रस्त यादीत आहे. त्यापैकी जांबरुंग, जांबरुंग बौद्धवाडी आणि खरवई याठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. वावोशी, रानसई आदिवासी वाडी, ढेबेवाडी आणि गर्जेवाडी यांनी पाणीटंचाईमुळे टँकरची मागणी प्रशासनाकडे केली असून तसा प्रस्ताव खालापूर पंचायत समितीने तहसीलदारांकडे पाठवला आहे.

सिंचनाचे पाणी व्यावसायिक वापराला
तालुक्यात मोरबा, कलोते मोकाशी, डोणवत आणि भिलवले चार मोठी धरणे तसेच आठ पाझर तलाव आहेत. मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौक गाव वगळता मोरबे धरणाचा फायदा खालापूर तालुक्याला होत नाही. सिंचनासाठी असलेले कलोते मोकाशी धरणातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी पाणी उचलले जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे इमॅजिका पार्क असून दिवसाला पंधरा लाख लिटर पाणीपुरवठा होतो. उर्वरित पाणी धरणाजवळचे फार्महाउस, हॉटेल यांना दिले जाते. डोणवत धरणावर १४ गावांची पेयजल योजना अवलंबून असून या भागातील कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो.

मागणीप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या सहा ठिकाणी टँकरची मागणी झाली असून तीन ठिकाणी नेहमी टँकर पाठवण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- लहू ढोले, पंचायत समिती, पाणीपुरवठा विभाग


फोटो ः टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT