मुंबई

अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी चिंताक्रांत

CD

अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी चिंताग्रस्त
वासिंद, दि. १७ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे वासिंद बाजारपेठेतील दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडली. मॉन्सूनपूर्व शेतीची कामे सुरू केलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
दोन दिवसांपासून दमट वातावरणात दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असून, सायंकाळी मात्र पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे वासिंद बाजारापेठेत अर्धवट राहिलेल्या गटारांत पावसाचे पाणी साचून राहते. तुंबलेल्या गटारातील पाण्याचा निचरा होण्यास कोणताही मार्ग नसल्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही दुकानदार नुकसान होण्याच्या भीतीने आपल्या स्वखर्चाने संरक्षक कठडा बांधून घेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा आर्थिक भुर्दंड वासिंदमधील दुकानदारांना सहन करावा लागत आहे.
परिसरातील वीटभट्टी मालक आणि शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. शेतात राब पसरवून पेटवले जात आहेत. दरम्यान, पावसात राब पूर्णपणे ओला झाल्याने मातीतील रोग आणि कीटकांची संख्या वाढण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. वासिंद परिसरात भातशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाच्या भरवशावर करण्यात येणाऱ्या शेतीला मे महिन्यापासूनच शेतकरी तयारीला लागतो. यंदा पावसाने शेतकऱ्यांना चकवा देत मे महिन्यातील गणितच बिघडवून टाकले आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पेटवलेल्या वीटभट्टीवर पाऊस पडल्याने बहुतेक वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे मोठे नुकसान
तालुक्यात दोन दिवसांत वीज पडून तीव जण मयत झाले. कोठारे येथील एका वृद्ध व्यक्तीवर तर डोळखांब येथील बाइकवर वीज पडली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. विविध तीन ठिकाणी गुरांचा गोठा आणि घरावर झाडे पडल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यात महावितरणला आयतेच कारण मिळत असल्याने संपूर्ण तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. वातावरणातील या बदलामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे.

अचानक आलेल्या पावसाने फार मोठे नुकसान केले. कामगारांचा पगार व इतर झालेला खर्च वगळता यावर्षी हाती काहीच लागणार नाही.
- सुनील पाटील, वीटभट्टी मालक

रस्त्याची उंची वाढवल्याने पावसाचे पाणी दुकानात शिरत आहे. रस्त्याच्या उंचीला विरोध करूनही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. आता दुकानदारांची होणारी नुकसानभरपाई कोण देणार?
- कुणाल पांडव, दुकानदार, वासिंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT