मुंबई

अवकाळी

CD

तासाभराच्या पावसाने तुंबली गटारे

पेणमध्ये नालेसफाईची पोलखोल

पेण, ता. २० (वार्ताहर) : भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पेणमध्ये जवळपास तासभर पाऊस पडल्याने शहरातील गटारे तुंबल्‍याचे दिसून आले. पेण नगरपालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाई न झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असून, तत्‍पूर्वी शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. ती न झाल्‍यास रस्‍त्‍यांना नाल्‍याचे स्‍वरूप येत असल्‍याचे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी सांगितले. याबाबत नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी दयानंद गावंड यांच्याकडे विचारणा केली असता, पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत, मात्र काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांची कामे सुरू असून, गटारांमध्ये राडारोडा, माती टाकण्यात आल्‍याने गटारे तुंबली. या व्यावसायिकांना गटारातील डेब्रिज उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

................


पावसामुळे रानमेवाही बेचव
आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह संकटात

रोहा, ता. २० (बातमीदार) ः तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी ठाकूर समाज उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी किंवा डोंगरमाथ्यावर जाऊन रानमेवा गोळा करतात. करवंदे, जांभूळ, आंबे, चिंचा ही फळे विकून त्‍यांना चार पैसे मिळतात, परंतु आठवडाभरापासून सुरू असलेल्‍या पावसामुळे रानमेवा बेचव झाला आहे. त्‍यामुळे आदीवासींच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
सायंकाळी ढग दाटून येत विजांच्या कडकडाटासह दाखल होणाऱ्या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडते. त्‍यामुळे जांभूळ, आंबे, करवंदे खराब होत आहेत. दर्जा खालावल्‍याने ग्राहकांनी रानमेवाकडे पाठ फिरवल्याने आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिवासी व ठाकूर समाज बाजारात किंवा गावोगावी फिरून तसेच रस्त्यालगत एखाद्या झाडाचा आसरा घेत करवंदे, आंबे, जांभूळ व अन्य रानमेव्याची विक्री करतात. पावसामुळे फळांवर कीड पडल्‍याने तसेच दर्जा खालावल्‍याने ती बेचव झाली आहेत.

...............

पावसामुळे शेतीचे नुकसान
रोहा, ता. २० (बातमीदार) ः आठ-दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील कोलाड विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्‍याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पूर्व मोसमी पावसामुळे तयार भातशेतीची कापणी, झोडणी सुरू असताना पावसाने धुमाकूळ घातल्‍याने भातपिकाचा दर्जा खालावण्याची भीती आहे. रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा, मात्र सतत येणारी नैसर्गिक संकटे तसेच वाढती महागाई व मजुरांअभावी लागवडीखालील क्षेत्र तसेच उत्‍पादनही घटले आहे. पूर्व मोसमी पावसामुळे कोलाड विभागातील पुगाव, खांबसह अन्य भागात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान केल्‍याने शेतकरी हतबल झाले आहेत.

बदलत्या वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्‍याने कापणी करू नये. याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्वकल्पना दिली आहे. दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच अवकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जातील.
- महादेव करे, कृषी अधिकारी, रोहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT