मुंबई

संदेश शेवाळे

CD

सुधागड तालुक्याचे अष्‍टपैलू व्यक्‍तिमत्त्‍व
राजकारण, व्यवसाय व समाजसेवेचा अद्वितीय संगम ः संदेश शेवाळे


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुधागड तालुका अध्यक्ष, प्रसिद्ध तरुण उद्योजक व विकसक आणि सुधागड तालुक्यातील वैतागवाडी या छोट्या गावातून आलेल्या संदेश शेवाळे यांच्या एकूणच प्रवासाला व देदीप्यमान कारकीर्दीला ‘शून्यातून साम्राज्य उभारण्याची गोष्ट’ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ग्रामपंचायत सदस्यापासून ते तालुका अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास, भव्य व्यावसायिक साम्राज्य आणि समाजकारणातील अमिट छाप... ही सर्व यशोगाथा म्हणजे ‘कष्ट, चिकाटी आणि जनसेवेचा’ जिवंत वास्तूपाठच आहे.


राजकीय उत्थान ः नव्या पिढीचे धाडसी नेतृत्व
जिद्द, मेहनत, कष्ट आणि दांडगा लोकसंपर्क यांच्या जोरावर अगदी कमी काळात संदेश शेवाळे यांनी आपल्या राजकीय प्रवासात वेगवान भरारी घेतली. भल्याभल्यांना जमणार नाही, असे उल्लेखनीय काम राजकीय क्षेत्रात अतिशय कमी वयात केले आहे आणि महत्त्वाची पदे भूषवून त्यांना योग्य न्यायदेखील दिला आहे. पाच वर्षांत त्‍यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष, सुधागड तालुका अध्यक्ष (सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नाव नोंद) म्‍हणून उल्‍लेखनीय कामगिरी केली आहे.

पक्षाची पुनर्बांधणी : एकाकी लढा
२०२२ मध्ये जेव्हा मोठे नेते पक्ष सोडून गेले, अनेकांना वाटले आता सुधागड तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल. तेव्हा संदेश शेवाळे यांनी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून ‘एकला चलो रे’ धोरणाने पक्षाची पुनर्बांधणी केली. हतबल न होता, न डगमगता आपल्या प्रभावी नेतृत्वगुण व संघटन कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच पक्षाला नवी उभारी दिली.
- शेकडो पक्षप्रवेश कार्यक्रमातून आतापर्यंत हजारो कार्यकर्ते जोडले गेले आहेत.
- तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पक्ष संघटना पुनर्जीवित केली.
- विकासकामांच्या जोरावर विरोधकांना चोख प्रत्‍युत्तर दिले.
- पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना व तरुणांना संधी व पद दिले.
- पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन शिस्त लावली.
- तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्ष संघटना अधिक मजबूत व बळकट केली.

व्यावसायिक यश ः उद्योजकतेचे आदर्श
केवळ राजकारणातच संदेश शेवाळे यांनी आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला नाही तर व्यवसाय-उद्योग क्षेत्रातही त्यांनी अलौकिक कामगिरी करून दाखवली आहे. एका मराठमोळ्या तरुणाने अशा प्रकारे उद्योग व व्यापार क्षेत्रात उंच भरारी घेणे, हे खरंच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे. लोकांशी असलेले आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते, त्याचबरोबर प्रामाणिकपणा, व्यवहारचातुर्य, ग्राहकांशी जोडलेली नाळ, दर्जेदार सेवा व उत्तम व्यवस्थापन गुण यामुळे संदेश शेवाळे उद्योजकता क्षेत्रामध्ये यशस्वी झाले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स ते रिअल इस्टेट : बहुआयामी साम्राज्य
शेवाळे इलेक्ट्रॉनिक्स : पाली, नागोठणे, रोहा येथील शोरूम्सद्वारे १५,००० + ग्राहकांना दर्जेदार सेवा
सुधागड ग्रीन व्यू : पर्यावरणास अनुकूल असलेले २५ एकरमध्ये रिअल इस्टेट प्रकल्प

डिजिटल फार्मिंग सोल्यूशन्स : आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार

स्टार्टअप महाराष्ट्राचे प्रेरणास्थान
स्वतःचा सर्वांगीण विकास करणे हे संदेश शेवाळे यांचे ध्येय नसून आपल्यासारखे इतरही तरुणांनी राजकारण, व्यापार, उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवावा व यशस्वी व्हावे, यासाठी संदेश शेवाळे असंख्य मार्गाने प्रयत्न करीत आहेत आणि अनेक तरुणांना व महिलांना तशाप्रकारची संधीदेखील उपलब्ध करून देत आहेत.
- सुधागड यंग एंटरप्रेन्योर पुरस्‍कार सुरू करून ५० हून अधिक तरुणांना प्रोत्साहन दिले.
- ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबन योजना राबवून २०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.


समाजसेवा ः जनतेच्या हृदयात आदराचे स्‍थान
समाजातील गोरगरीब, उपेक्षित व आदिवासी आदी सर्व स्तरातील लोकांच्या सुखासाठी व आनंदासाठी संदेश शेवाळे यांची अविरत धडपड सुरू असते. मग विविध माध्यमांद्वारे व उपक्रमांद्वारे ते या लोकांपर्यंत सहकार्य व मदतीचा हात देतात. होळी, दिवाळी व इतर कोणताही सण असला तर हमखास संदेश शेवाळे अशा गोरगरीब जनतेला तसेच आदिवासी बंधू-भगिनींना विविध प्रकारचे साहित्यवाटप करून आणि त्यांच्यासोबत सण-उत्सव साजरे करून आनंद देण्याचा प्रयत्न करतात. अशा असंख्य लोकांचे आशीर्वाद संदेश शेवाळे यांच्या पाठीशी नेहमीच असल्यानेच ते सर्व क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत.
अडचणीत असलेल्या माणसाला सढळ हस्ते मदत करण्याचे काम संदेश शेवाळे नेहमीच करतात. या वेळी ते कोणतेही राजकारण मध्ये आणत नाहीत. सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संदेश शेवाळे यांचे अतिशय मित्रत्वाचे संबंध असल्याने ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात.


विकासाचा ध्यास ः शेकडो कोटींची विकासकामे मार्गी
सुधागड तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि येथील जनतेला चांगल्या दर्जेदार सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी संदेश शेवाळे सातत्याने काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात अनेक कोटींची कामे झाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावे, वाड्या-पाड्यांसह सर्व शहराच्या विकासात हातभार लावला आहे. रस्ते, विहिरी, बंधारे, समाजमंदिरे, सभागृह, स्मारके, बसस्थानक शेड, अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. काही कामे स्वखर्चाने पूर्ण केली आहेत.
त्यांच्या माध्यमातून नाडसूर ग्रामपंचायतीला सुंदर ग्राम पुरस्कार मिळून तब्बल ५० लाखांचे बक्षीस मिळाले. आरोग्य क्षेत्रातदेखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या माध्यमातून पाच गावांमध्ये मोबाईल क्लिनिक सुरू झाले होते. तसेच कोविड काळात त्यांनी एक हजारहून अधिक लोकांना विनामूल्य औषधे तसेच मास्क व सॅनिटायझर यांचे वाटप केले.

शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृतीचे संवर्धन
शैक्षणिक कार्याला संदेश शेवाळे हे नेहमीच सढळ हस्ते मदत करतात. तळागाळातील विद्यार्थी शिकून मोठे व्हावे व तालुक्याचे नाव करावे, यासाठी संदेश शेवाळे नेहमीच प्रयत्नशील असतात. क्रिकेट व कबड्डीवर संदेश शेवाळे यांचे विशेष प्रेम आहे, त्यामुळे ते आवर्जून क्रिकेट आणि कबड्डीचे सामने आयोजित करतात. त्याचबरोबर ठिकठिकाणी बक्षिसेदेखील देतात. सुधागड तालुक्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, विविध कलाकार आदींना सढळ हस्ते मदत करण्याचे व त्यांच्या उपजत कलागुण व कौशल्यांना वाव आणि व्यासपीठ मिळवून देण्याचे काम संदेश शेवाळे अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यासाठी ते अनेक उपक्रम राबवतात.
- सुधागड प्रीमियर लीग : १६ गावांच्या क्रिकेट संघांची स्पर्धा
- ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम : मधुरा वेलणकर यांच्या हस्ते ५००हून अधिक महिलांचा सन्मान
- छत्रपती शिवाजी स्मारक : आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने पाच लाखांची तरतूद
- कबड्डी व क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन व खेळाडूंना भरपूर बक्षिसांचे वाटप

सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनाची चळवळ कायम सुरू राहावी, यासाठीदेखील संदेश शेवाळे विविध प्रकारे उपक्रम राबवतात. गावे, वाड्या-पाड्यातील जयंती, महोत्सव, यात्रा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम, समाजमंदिर उभारणी, बस निवारा शेड बांधणे, सांस्कृतिक स्पर्धा यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देतात, तसेच आवर्जून उपस्थितदेखील राहतात.

आध्यात्मिक ओढ व वारकरी संप्रदायाचे विशेष आशीर्वाद
संदेश शेवाळे यांच्या हसतमुख आणि शांत व संयमी स्वभावाचे कारण हे त्यांना असलेली आध्यात्मिक ओढ आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यांना ते सढळ हस्ते मदत करतात आणि सर्व धार्मिक समारंभात ते नेहमीच सहभागी होतात. वारकरी संप्रदायाचे त्यांना विशेष आशीर्वाद आहेत. या आशीर्वादाच्या जोरावरच ते सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. याबरोबर ते सर्वधर्मसमभावदेखील जोपासतात आणि सर्वधर्मीयांच्या धार्मिक समारंभात आवर्जून सहभागी होतात व सहकार्य करतात.

नवीन योजना आणि भविष्यातील ध्येय
संदेश शेवाळे यांच्याकडे भविष्याकडे पाहण्याची व त्या अनुषंगाने वाटचाल करण्याची विकासात्मक दृष्टी आहे. निश्चित ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते मार्गक्रमण करीत असतात आणि हा दृष्टिकोनच त्यांना एक प्रगल्भ आणि दूरदृष्टीचा नेता म्हणून अग्रेसर ठरवतो. अनेक ध्येय व मिशन त्यांनी उराशी बाळगले आहेत. त्यातील अनेक उद्दिष्टे व ध्येय साध्य झाले आहेत तर अनेक ध्येय आगामी काळात पूर्ण होतील.

- डिजिटल सुधागड मिशन : प्रत्येक गावात विनामूल्य वाय-फाय झोन
- सुधागड सुपर ५० : गरीब मुलांसाठी आयएएस/आयपीएस होण्याबाबत मार्गदर्शन केंद्र
- सौरऊर्जा प्रकल्प : १० गावांमध्ये सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करणार
- तालुक्यातील तरुणांना रोजगार निर्मिती व स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे.
- दर्जेदार शिक्षण व उत्तम आरोग्य सोयीसुविधा तालुक्यामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.

तटकरे कुटुंबीयांशी एकनिष्‍ठ, विश्वासू शिलेदार
खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे अतिशय विश्वासू म्हणून संदेश शेवाळे ओळखले जातात. अनिकेत तटकरे हे संदेश शेवाळे यांना आपल्या लहान भावाप्रमाणे प्रेम देतात. तटकरे कुटुंबीयांच्या माध्यमातून शेवाळे यांनी सुधागड तालुक्याच्या विकासासाठी खूप मोठा हातभार लावला आहे. त्याचबरोबर तटकरे कुटुंबीयांबद्दल त्यांची एकनिष्ठता, कौटुंबिक स्नेह व आपुलकीची भावना सदैव कायम आहे.

सुधागडचा सुपरस्टार, महाराष्ट्राचा अभिमान
संदेश शेवाळे यांनी सिद्ध केले आहे, की प्रामाणिक नेतृत्व म्हणजे फक्त पद नसते, तर जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणे असते. त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता, दांडगा जनसंपर्क व नवीन विचार या गोष्टींचा प्रकर्षाने समावेश असतो. यामुळे ते केवळ नेते नाहीत, तर एक चळवळ, एक आदर्श आणि एक प्रेरणा आहेत. जे गावाला विसरतात, गाव त्या नेत्याला कधीच विसरत नाही, अशी युक्ती संदेश शेवाळे यांच्यासाठी तंतोतंत लागू पडते.

- अमित गवळे, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT