मुंबई

अवघे डोंबिवली झाले तिरंगामय

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅली काढण्यात आली. डोंबिवलीतही रविवारी (ता. १८) तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत माजी सैनिक, सैन्य दल अकादमीमधील जवान आणि हजारो डोंबिवलीकरांनी हातात तिरंगा घेत सहभाग नोंदवला. देशभक्तीपर गीत आणि भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचे पाहायला मिळाले.
डोंबिवलीमध्ये रविवारी महायुतीच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली होती. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर येथून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली फडके रोड, इंदिरा चौक, टिळक रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा येथे रॅलीची सांगता झाली. हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. तसेच नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाले होते.

भारतीय सैन्यांचा अभिमान
भाजप आमदार चव्हाण यावेळी म्हणाले, भारतीय सैन्याने केलेला पराक्रम, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सिंदूर नावाने ऑपरेशन जे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झाले, त्याचे कौतुक. हा दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी म्हणून संपूर्ण देश सैन्याच्या मागे उभा आहे, हे सांगण्यासाठी रॅली काढण्यात येत आहे. डोंबिवलीमध्येही रॅली काढण्यात आली. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे काम भारतीय सैन्य करत आहे. आम्हा सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे. यानंतरच्या काळात दहशतवादी हल्ले जगात होता कामा नये, म्हणून आज दहशतवादाविरोधात संपूर्ण जग एकवटला आहे.

डोंबिवली : शहरात हजारो डोंबिवलीकरांनी तिरंगा रॅली काढली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Dahi Handi 2025 : जिथं जय जवान पथक कोसळलं, तिथंच कोकण नगर पथकानं रचला 10 थरांचा इतिहास; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनीही केलं कौतुक

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने होम लोन केले महाग

Irfan Pathan : धोनीने मला संघाबाहेर ठेवलं...! इरफान पठाणने सांगितला २००९ चा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने रचला २०२५ मधील पहिला १० थरांचा विश्वविक्रम

'आयुष्यात सगळंच अवघड होऊन बसलय' गोविंदाची पत्नी मंदिरात मोठमोठ्याने रडली, पण नक्की झालं काय?

SCROLL FOR NEXT