नरेश म्हस्के यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार रविवारी (ता. १८) जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच सत्रामध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शिनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या पुरस्कारांची स्थापना केली. मे २०१०मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे उद्घाटन डॉ. कलाम यांनी केले होते. उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान केले जातात. २०२४ पर्यंत १४ पुरस्कार समारंभांमध्ये १२५ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील खासदार नरेश म्हस्के (शिवसेना), स्मिता वाघ (भाजप), ॲड. वर्षा गायकवाड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रा. मेधा कुलकर्णी (भाजप), अरविंद सावंत (ठाकरे गट) यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार २०२५ प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील १७ खासदारांसह दोन संसदीय स्थायी समित्यांना नामांकन देण्यात आले आहे.
.....................................
चौकट :
शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला जाहीर झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.