मुंबई

भाजपच्या मंडळ अध्यक्षाचा तिढा सुटला

CD

उल्हासनगर, ता. २० (बातमीदार) : मंडळ अध्यक्षांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महिन्याभरापूर्वी भाजपने उल्हासनगरातील आठपैकी सात मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र अनेक नावे स्पर्धेत असल्याने एका मंडळ अध्यक्षाचे नाव गुपित ठेवले होते. आता या नावाचा तिढा सुटला असून, जय शर्मा यांच्या नावावर मंडळ ४ बच्या अध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मंडळ १मधून अरविंद मिश्रा, मंडळ २मधून रामप्रवेश यादव, मंडळ ३ अमधून विक्की इसरानी, मंडळ ३ बमधून हरेश भाटिया, मंडळ ४ अमधून स्वप्नील पगारे, मंडळ ५मधून बंटी कुरसीजा यांच्या अध्यक्ष पदावर नियुक्त्या मंगळवारी (ता. २०) करण्यात आल्या. तसेच, म्हारळ, वरप, कांबा ही गावे विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने येथील मंडळ ६मधून योगेश देशमुख यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. मंडळ ४ बमधून माजी आमदार गणपत गायकवाड यांचे कट्टर समर्थक नीलेश बोबडे, संजय रामरखीयानी, जय शर्मा ही नावे स्पर्धेत असल्याने आणि कुणीही माघार घ्यायला तयार होत नसल्याने मंडळ ४ ब अध्यक्षाचे नाव हे गुपित ठेवण्यात आले. महिन्याभरात एकमत झाल्याने जय शर्मा यांची ४ ब मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT