मुंबई

मत्स्य विभागाची गस्ती नौकाच विनापरवाना

CD

उरण, ता. २० (वार्ताहर) : समुद्रात विनापरवाना मासेमारी करणाऱ्या बोटींची तपासणी करून त्या बोटींवर कारवाई करण्यासाठी असलेल्या मत्स्य विभागाच्या परवाना विभागाची बोटच विनापरवाना समुद्रात गस्त घालताना आढळली. त्यामुळे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १९) त्या बोटीवर कारवाई करून जप्त केली आहे. ही बोट मुंबईच्या यलो गेट पोलिस ठाण्याजवळ ठेवण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात नौदल आणि कोस्टगार्ड यांची गस्त वाढविण्यात आली आहे. कोणत्याही संशयित किंवा परवाना नसलेल्या बोटीवर कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे आदेश आहेत. त्यातच सोमवारी उरणचे परवाना अधिकारी सुरेश बाऊलगावे यांच्यासह मत्स्य विभागाचे अधिकारी समुद्रात गस्त घालत असताना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ही बोट अडवली आणि त्या बोटीची तपासणी केली. त्या वेळेस त्यांना या बोटीला मासेमारी परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ही बोट जप्त करून यलो गेट पोलिस ठाण्यात नेऊन गोदीमध्ये ठेवण्यात आली आहे.
-----------------
मच्छीमारांचा संतप्त सवाल
आमच्या बोटींना मच्छीमार परवाना नसला तर हे अधिकारी आमच्या बोटींवर कारवाई करून भरमसाट दंड आकारतात. क्षुल्लक गोष्टींसाठी मच्छीमारांना वेठीस धरतात आणि हेच अधिकारी विनापरवाना बोटीतून गस्त घालतात, हे खूप धक्कादायक आहे. जर बोटीला परवाना नव्हता तर ते अधिकाऱ्यांनी तपासले का नाही, असा सवालही मच्छीमारांकडून विचारला जात आहे.
----------------
समुद्रात गस्त घालत असताना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी आमची बोट पकडली आहे. ही बोट यलो गेट पोलिस ठाण्याजवळ ठेवली आहे. आमची नेहमीची गस्ती नौका बंद पडल्याने गस्ती नौकेचे ठेकेदार यांनी त्यांच्याजवळची मासेमारी नौका आम्हाला गस्तीसाठी दिली होती; मात्र या बोटीचा मासेमारी परवाना संपला होता याची आम्हाला कल्पना नव्हती.
- सुरेश बाऊलगावे, परवाना अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT