मुंबई

शाळा सुरू होताच मिळणार शैक्षणिक साहित्य

CD

शाळा सुरू होताच मिळणार शैक्षणिक साहित्य
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा दावा
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे उशिरानेच वाटप होते. यंदा मात्र शैक्षणिक साहित्य जूनमध्ये शाळा सुरू होताच देण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उशिराने मिळण्याची पंरपरा खंडित होणार आहे.

यंदा जून महिन्यातच शैक्षणिक साहित्याचे वाटप होईल, असा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. केडीएमसीच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गोरगरीब कुटुंबातील मुले, मुली शिक्षण घेतात. या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप उशिराने होत असल्याने शैक्षणिक नुकसान होते. यंदा मात्र पालिका प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाच्या ५९ प्राथमिक, दोन माध्यमिक अशा एकूण ६१ शाळा आहेत. या पालिका शाळांमध्ये ४,०७१ मुले आणि ४,३६७ मुली असे एकूण ८,४३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेला विलंब, लेखा विभागाची वेळेवर मंजुरी न मिळणे इत्यादी कारणांमुळे दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर काही महिने जुनेच गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. यंदा मात्र शाळा सुरू होताच शैक्षणिक साहित्य मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की वर्षभर राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनाचे एक वेळापत्रक बनविले आहे. शैक्षणिक साहित्याचे वाटप जूनमध्येच होईल, या दृष्टिकोनातून नियोजन आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पडली आहे. काहींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ जूनला वह्यांचे वाटप केले जाणार आहे. उर्वरित सगळे साहित्यही जूनमध्येच मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले.

गणवेश वाटप
केडीएमसीच्या बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंत मुलांना हाफ शर्ट, हाफ पॅन्ट तर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हाफ शर्ट, फुल पँन्ट आणि टाय असा गणवेश आहे. बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना पिनो फ्रॉक आणि शर्ट तसेच पाचवी ते दहावीपर्यंत सलवार कुर्ता आणि ओढणी असा गणवेश आहे. त्याचबरोबर बूट, मोजे, रेनकोट पुरविले जातात. इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना नऊ वह्या, इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० वह्या, तर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १७ वह्या दिल्या जातात. शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी वह्यांचे वाटप केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Updates Live : छत्रपती संभाजीनगर म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

राजा रघुवंशीच्या दारात कडेवर बाळ घेऊन पोहोचली महिला; DNA रिपोर्टच्या दाव्यामुळे उडाली खळबळ, तिच्याकडे असा कोणता पुरावा आहे?

Pune Traffic: वाहतूक कोंडीत गुदमरतोय रहिवाशांचा जीव; केशवनगर, मुंढव्यातील गंभीर स्थिती, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे भर

SCROLL FOR NEXT