मुंबई

कामतघर येथील ३० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

CD

भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील विविध विकास कामांसाठी माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्या प्रयत्नातून आमदार महेश चौगुले यांच्या सहकार्याने सरकारकडून विविध विकासकामांसाठी ३० कोटी रुपये मंजूर केले आहे. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते कामतघर ओसवाल वाडी परिसरात नुकताच पार पडला. याप्रसंगी शिवसेना शहर जिल्हाध्यक्ष सुभाष माने, भाजप शहराध्यक्ष रवीकांत सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते, आनंद गद्रे, वंदना काटेकर, जयेंद्र सावला, संजय काबुकर, विनोद मालदे, हितेश मारू, रतीलाल सुमरिया, सुंदर नाईक, जीवराज नागरिया यांसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मनोज काटेकर यांनी कामतघर परिसरातील काँक्रीट रस्ते, आरसीसी नाले, पथदिवे बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारने ओसवालवाडी या भव्य अशा निवासी संकुल परिसरातील जागनाथ मंदिर ते वरद हाईट्स व मुनिसुव्रत चौक ते जांगीड ईलाईटपर्यंत काँक्रीट रस्ता, निर्मलधारा ते अमीधारापर्यंत काँक्रीट रस्ता, कल्पतरू गार्डन ते मुनिसुव्रत अपार्टमेंटपर्यंत काँक्रीट रस्ता व पथदिवे, कामतघर स्मशानभूमी ते भवानी नगर सी. सी. नाला व भवानी नगर येथील आर.सी.सी. रस्ता, साईनगर ते काटेकरनगर, तरे कम्पा‍ऊंडपर्यंत काँक्रीट रस्ता, भारत कॉलनी, चौधरी कंपाऊंड, भवानी नगर येथील काँक्रिट गटर पाथवेज,तरे कंपाऊंड,काटेकर नगर, नरेश नगर परिसरात सी.सी. रस्ता व गटर पाथवेज, कल्पतरू गार्डनसमोर आर.सी.सी. नाला बांधणे ही कामे या परिसरात केली जाणार आहेत. मनोज काटेकर निधी आणून काम पूर्णत्वास आणल्याने परिसराचा कायापालट होत आहे. याबद्दल आमदार महेश चौघुले, शिवसेना शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांनी काटेकर यांच्या कार्याची प्रशंसा केली. काटेकर यांनी या परिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याचा संकल्प जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म ! पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT