मुंबई

२०३ डॉक्टरांची कंत्राट पद्धतीने भरती

CD

२०३ डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती
१६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध पदांवर नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक रुग्णालयांचे खासगीकरण सुरू आहे. आता आरोग्य विभागाने यामध्ये आणखी एक भर म्हणून पालिकेच्या सर्व १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध पदांवर २०३ वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अंतर्गत केईएम, सायन, नायर, कूपर यासह पाच प्रमुख रुग्णालये येतात. तसेच १६ उपनगरीय रुग्णालये, १९० दवाखाने, २११ आरोग्य केंद्रे आणि २४१ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहेत. येथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात, त्यापैकी मोठ्या संख्येने रुग्ण त्यांच्या स्थितीनुसार प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये दाखल होतात. यामध्ये महापालिका प्रशासनाने भगवती रुग्णालय, वांद्रे येथील के. बी. भाभा, मुलुंडचे एम. टी. अग्रवाल, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय ही रुग्णालये खासगीकरणाच्या वाटेवर आहेत. दरम्यान, बऱ्याच विरोधानंतर ‘भगवती’चे खासगीकरण सध्या तरी थांबवण्यात आले आहे. यातच महापालिका आता त्यांच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची २०३ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. याअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत याबाबत पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.


या पदांसाठी भरती
महापालिकेतील १३७ डॉक्टरांना दोन वर्षांच्या करारावर नियुक्त केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये ५६ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ५ पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी आणि रेडिओलॉजी विभागासाठी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, ८३ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि ४३ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये भूलशास्त्र, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, मायक्रोबायोलॉजी, स्त्रीरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, बालरोगतज्ज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट या पदांचा समावेश आहे. यासोबतच पाच वैद्यकीय अधिकारी आणि सहा फिजिओथेरपिस्टचीही नियुक्ती केली जाईल. या सर्वांचे वेतन ९० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असेल, फक्त फिजिओथेरपिस्टचा पगार ४० हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे.

६०,००० हून अधिक पदे रिक्त
पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी धोरणानुसार रिक्त पदे भरली जात नाहीत. महापालिकेतील एकूण १,४५,५७३ पदांपैकी फक्त ८५,००० कर्मचारी कार्यरत आहेत, तर सुमारे ६०,००० पदे रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT