मुंबई

१ जूनपासून बस प्रवासावर महिलांना ५०% सवलत

CD

वसई-विरारच्या महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत
विरार, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एसटी बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाते. एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई या महापालिकांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत मिळत नव्हती. वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महिलांसाठी बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, १ जूनपासून वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे.
शुक्रवारी पालिका मुख्यालयात आयुक्त पवार यांनी अधिकृत पत्राद्वारे स्नेहा दुबे पंडित यांना ही माहिती दिली. या निर्णयामुळे वसई-विरारमधील हजारो महिला प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरात शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर; उद्या ऑरेंज सिटीला ऑरेंज अलर्ट; दिवसभरात १७९ मिमी पाऊस

Sanju Samson: विराट कोहलीचा सल्ला मानला, पण जेमतेम दीड वर्षच पाळता आला; संजू सॅमसनने सांगितला खास किस्सा, नेमक काय म्हणाला संजू?

Latest Live Updates Marathi : नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका, सोनेगाव पोलीस स्टेशन पाण्याखाली

Pune Stray Dog Census : पुण्यात भटक्या श्वानांची नव्याने गणना; जुनी हद्द व समाविष्ट ३२ गावांतील संख्येचा एका वर्षात ताळेबंद

महाभारतातील महान योद्ध्याची अनोखी गाथा; अॅनिमेटेड सिरीजमधून उलगडणार कर्णाचा महासंग्राम!

SCROLL FOR NEXT