मुंबई

तुर्कियेसोबतची निविदा रद्द करण्याची भाजपची मागणी

CD

तुर्कियेसोबतची निविदा रद्द करण्याची भाजपची मागणी

मुंबई, ता. २३ : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कियेवर भारताने बहिष्कार घातला असताना मुंबई महापालिका प्रशासनाने तुर्की बनावटीच्या चौपाट्यांवर जीवरक्षक रोबोटिक बचाव यंत्रे विकत घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. ही निविदा रद्द करण्याची मागणी भाजपने पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईच्या चौपाट्यांवर जीवरक्षक रोबोटिक बचाव यंत्रे विकत घेण्यासाठी महापालिका निविदा प्रक्रियेत तुर्कियेतील एक कंपनी पात्र झाली असून, प्रशासनाने या कंपनीस कंत्राट देण्याचे कार्यादेश दिल्याचे समजते. याविरोधात भाजपचे माजी नगरसेवक आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित यंत्राच्या खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदा आणि दिलेले कार्यादेश युद्धपातळीवर त्वरित रद्द करून तुर्कियेतील कुठलेही उत्पादन पालिकेने घेऊ नये, अशी मागणी पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे शिरसाट यांनी केली आहे. तुर्कियेतील यंत्र खरेदी करण्यात आल्यास आम्ही ते रस्त्यावर चालू देणार नाही, त्याविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT