मुंबई

देवनार कचरा प्रकल्पाविरोधात जनहित याचिका

CD

देवनार कचरा प्रकल्पाविरोधात जनहित याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२३ : देवनार कचराभूमी येथील प्रस्तावित तीन हजार मेट्रिक टन कचऱ्याचे विजेत रुपांतरीत करणाऱ्या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. गोवंडीतील अल अब्बास चॅरिटेबल फाउंडेशनने ही याचिका दाखल केली आहे. या परिसरात होणाऱ्या धारावीतील रहिवाशांच्या स्थलांतरणालाही स्थगिती देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

देवनार कचराभूमी प्रकल्पाला परवानगी मिळाल्यास आधीच प्रदूषित परिसरात आणखी गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होतील, त्याचप्रमाणे, परिसरात राहणाऱ्या दहा लाखांहून अधिक नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचे गंभीररीत्या उल्लंघन होईल, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. हा प्रकल्प ६०० मेट्रिक टन क्षमतेचा असून तो ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, बैंगनवाडी आणि जवळपासच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात अनेक वर्षांपासून देवनार कचराभूमी कार्यान्वित आहे. या ठिकाणी काही समाजकंटकाकडून वारंवार आगी लावण्याच्या घटना घडतात, येथे होणारे विषारी उत्सर्जन आणि घनकचऱ्याच्या गैरव्यवस्थापनामुळे या परिसरातील लोकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. क्षयरोग, कर्करोग, दमा आणि इतर श्वसनाचे आजाराचे प्रमाण या भागात जास्त असल्याचे आकडेवारी सांगत असल्याचा दावाही याचिकेत केला आहे.

..
प्रकल्प रेटण्याचा घाट
देवनार कचराभूमी प्रकल्पाबाबत रहिवाशांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून देवनार कचराभूमीवरील प्रस्तावित कचऱ्याचे विजेत रुपांतरीत करण्याचा हा प्रकल्प रेटण्याचा घाट महापालिकेकडून घातला जात आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी देवनार कचराभूमीची १२४ एकर जमीन देऊ केली होती; परंतु, अशा स्थलांतरामुळे आधीच दूषित आणि धोकादायक अशा क्षेत्रात आणखी लोकसंख्येची भर पडून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यताही याचिकेत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Godavari River Flood Nashik : बाणगंगा नदीला महापूर, जानोरीचा पूल पाण्याखाली! नाशिक एअरपोर्ट रस्त्यावरील संपर्क तुटला; नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले

8th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! वेतनवाढ किती होणार ? ८ व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग, ५ अपडेट्स समोर

Latest Marathi News Live Update : 'विद्यार्थ्यांच्या हिताचे विधेयक भरकटवू नका'; काँग्रेसला किरेन रिजिजू यांचे आवाहन

India Test Squad for Sri Lanka: रवींद्र जडेजा पुनरागमनासाठी सज्ज; पण, ५ खेळाडूंच्या दुखापतींनी वाढवली चिंता, महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai Crime: वृद्धाला आठ कोटींना लुबाडले, दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटक; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT