मुंबई

कॅमेऱ्यांच्या बॅटऱ्या चोरल्याने यंत्रणा ठप्प

CD

कॅमेऱ्यांच्या बॅटऱ्या चोरल्याने यंत्रणा ठप्प
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : पश्चिमेतील गणेशघाट भागातील प्रेम ऑटो चौक परिसरात लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील १६ बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे कॅमेरे ठप्प झाले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा बंद पाडणाऱ्या अज्ञाताविरुद्ध कॅमेरा नियंत्रक कंपनीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २३) रोजी तक्रार दाखल केली आहे.

कल्याण पश्चिमतील वैकुंठधाम स्मशानभूमी भागातील गणेशघाट भागात प्रेम ऑटो चौकात एका कंपनीने परिसर नियंत्रणासाठी शासकीय कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसराचे नियंत्रण केले जाते. या नियंत्रण ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील एकूण १६ विजेच्या बॅटऱ्या अज्ञातांनी गुरुवारी रात्री दोनच्या दरम्यान चोरून नेल्या. या बॅटऱ्यांची किंमत ८० हजार रूपये इतकी आहे.

यंत्रणेवर परिणाम
कॅमेऱ्यातील बॅटऱ्या काढून नेल्यानंतर त्या भागातील यंत्रणेवर त्याचा परिणाम झाला. त्याची माहिती कंपनी नियंत्रकांना समजताच त्यांनी मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून नेल्याचे समजले. कॅमेरा नियंत्रण कंपनीचे अधिकारी शिशीर भोगले यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस पुढे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगलातच मुलींचा जन्म, वडील कोण? २०१८पासून जंगल, गुहेत कशी राहिली रशियन महिला

Crocodile: ‘कृष्णा’नंतर आता कोयनेलाही ‘मगर’मिठी; कऱ्हाडला नागरिकांत औत्सुक्य अन् घबराट; पावसाळ्यात पाणी वाढल्‍याने वावर

Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या प्रश्नावर भुजबळांचं मिश्किल उत्तर; शिळ्या कढीला ऊत कशाला आणता?

ATM Centre Theft : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने शेतकऱ्याला ४७ हजारांना लुटलं

"त्यांनी माझ्या वडिलांचं करिअर खराब केलं" डब्बू मलिकच्या लेकाचा काका अनु मलिकवर आरोप; "त्यांनी.."

SCROLL FOR NEXT