शाहू महाराज पालखी सोहळा गांगवली येथे उत्साहात
माणगाव (वार्ताहर) ः आशिया खंडातील सर्वोत्तम प्रशासक तसेच स्वराज्याचे चौथे छत्रपती शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज जयंती पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी शिवव्याख्याती सायली भोसले-पाटील हिने पहिला शाहू महाराज यांचा जन्मसोहळ्याचा पोवाडा सादर केला. रायगड भूषण रोहित सचिन भोईर आणि स्वरा सचिन भोईर यांनी जन्मोत्सवाच्या पूर्वसंधेला स्वरसंध्या हा शास्त्रीय संगीत कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला मुंबई, ठाणे, पुणे, भोर, सातारा, सांगली, मिरज, कर्जत आणि माणगांव, रायगडमधील शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या साडूंचे वंशज रघुनाथ दौलतराव, डुबल इनामदार, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते तळबीड, प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजीराव गुजर, प्रतापगडचे सरदार वीर कमलोजी साळुंखे यांचे वंशज सुहास शंकरराव साळुंखे, सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज श्रीमंत राणोजी राजे घोरपडे, पावनखिंडमध्ये शौर्य गाजवलेले ३०० बांदल यांचे वंशज संतोष बांदल, बेटर सोसायटी फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजूषा, आई कणकाई संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सुशील कदम, मंत्री भरत गोगावले यांची कन्या शीतल गोगावले-कदम, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर, विश्वस्त ज्ञानदेव दाखिणकर, उपसरपंच अनिल वनगुले, सदस्य रामचंद्र दाखिणकर, कृष्णा वाघमारे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सध्या स्मारक कामासाठी ५० लाख निधी मंत्री भरत गोगावले यांनी दिला आहे. शिवाय आणखी वाढीव चार कोटी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे वर्षभरात भव्य वास्तू उभी राहील, असे शीतल गोगावले यांनी या वेळी आश्वसित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.