अवघ्या दोन तासांत हरवलेल्या मुलाच्या पालकांचा शोध
कर्जत स्थानकावरील घटना; अपघातग्रस्त ग्रुपच्या सदस्यांची कामगिरी
कर्जत, ता. २४ (बातमीदार) ः उद्यान एक्स्प्रेसमध्ये हरवलेल्या एका चिमुरड्याला केवळ काही तासांच्या आत आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात कर्जत रेल्वेस्थानकातील सतर्क नागरिक आणि समाजमाध्यमावरील अपघातग्रस्त ग्रुपला यश मिळाले आहे. या कामगिरीत सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रुप सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही घटना बुधवार, २१ मे रोजी दुपारी २च्या सुमारास घडली. उद्यान एक्स्प्रेस कर्जत रेल्वेस्थानकात थांबली असताना, काही प्रवाशांनी एक लहान मुलगा संजीव राजू सरोज (अंदाजे वय ९) हरवल्याची माहिती दिली. या मुलाला गोंधळलेल्या अवस्थेतून गाडीतून उतरवण्यात आला होता. याचवेळी कर्जत स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर जागरूक नागरिक विनीत जाधव उपस्थित होते. त्यांनी तत्काळ या मुलाची चौकशी केली. संबंधित मुलाने तो कल्याण येथून चुकून एक्स्प्रेसमध्ये चढल्याचे सांगितले. तो मुलगा उल्हासनगरमधील आकाश कॉलनी येथे, महाराणा प्रताप शाळेजवळ राहणारा होता, मात्र पूर्ण पत्ता माहिती नसल्याने तो गोंधळला होता. त्यातच उल्हासनगरसारख्या विस्तीर्ण शहरात त्याचे पालक तातडीने शोधणे कठीण होते. ही माहिती खोपोली येथील अपघातग्रस्त ग्रुपवर शेअर करण्यात आली. ग्रुपचे सक्रिय सदस्य शुभम कंगळे यांनी ही माहिती तत्काळ उल्हासनगरमधील वैभव पोळ यांच्यापर्यंत पोहोचवली. वैभव पोळ यांनी तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलाच्या मामाशी संपर्क साधला आणि त्यांच्यामार्फत मुलाचे आई-वडील यांच्याशी संवाद साधण्यात यश आले. वैभव पोळ यांनी मार्गदर्शन करून मुलाच्या पालकांना कर्जत स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील लोहमार्ग पोलिस कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. या उल्लेखनीय कार्यामध्ये विनीत जाधव, शुभम कंगळे, वैभव पोळ आणि अपघातग्रस्त ग्रुपचे प्रमुख गुरु साठेलकर यांचे विशेष कौतुक होत आहे. समाजमाध्यमाच्या योग्य वापरातून आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.