अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) : पिढ्यानपिढ्या कुडाच्या घरात राहणाऱ्या आदिवासी वस्तीतील रहिवाशांना मिळालेल्या पत्र्यांच्या घरात महिलांनी फीत कापून आनंदी वातावरणात गृहप्रवेश केला. युवा युनिटीची तरुणाई आणि मुंबई रोटरी क्लबच्या सहकार्याने वाडीतील नागरिकांचा कुडाच्या घरातील वनवास संपुष्टात आला. या उपक्रमामुळे उंबरवाडीला नवीन ओळख प्राप्त झाली आहे.
अंबरनाथजवळील उंबरवाडीमधील डोंगराच्या पायथ्यावर राहणाऱ्या सात आदिवासी कुटुंबीयांना पिण्याचे पाणी, पायवाटा, दिवे, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्षानुवर्षे कुडाच्या घरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या अडचणींचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच युवा युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश चलवादी यांनी वाडीत नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याचे ठरवले. चलवादी यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई ब्रेव्हहार्ट यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून आदिवासींच्या घरांसाठी मिळालेल्या अडीच लाखांच्या अर्थसाह्यातून पत्र्याची घरे उपलब्ध करून दिली.
मुंबई रोटरी क्लब ऑफ मुंबई ब्रेव्हहार्टचय्या अध्यक्षा तसनीम मुन आणि योगेश चलवादी यांच्या उपस्थितीत सीता वाघे आणि सुनीता वाघे यांच्या हस्ते फित कापून शुक्रवारी (ता. २३) गृहप्रवेश करण्यात आला. सातपैकी चार कुटुंबांतील नागरिकांना घरे देण्यात आली, उर्वरित काम सुरू आहे. रोहित कुंभार, तरुण ठाकूर, नूर शेख आदींच्या हस्ते उंबरवाडीचे नामफलक लावण्यात आल्याने उंबरवाडीला वेगळी ओळख मिळाली आहे. आदिवासी वस्तीतील नागरिकांच्या गैरसोयींची प्रशासनाने दखल घेतली होती. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, पालिका अधिकारी सुनील जाधव, वन खात्याच्या अधिकारी वर्गाने वस्तीला भेट दिली होती. घरांचा प्रश्न सुटला असला, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.