हजारो सुशिक्षितांना रोजगाराची संधी
कल्याण (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुशिक्षितांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बँकिंग, रिटेल, आयटी, सेक्टर, लॉजिस्टिक, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, टेलिकॉम, बीपीओ मार्केटिंग, डाटा एन्ट्री इत्यादी सेक्टर्समधून ५० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग होता. यामध्ये जवळपास दोन हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे यांनी म्हटले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी नोकरीसाठी आलेल्या इच्छुकांना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढविले. कल्याण पूर्वेसह पंचक्रोशीतील तीन हजारहून अधिक इच्छुकांनी हजेरी लावली होती. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनोज नायर, सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले, उदय जाधव, शमिम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.