मुंबई

संजीवनी रुग्णालयाला पुरस्कार प्रदान

CD

खारघर, ता. २५ (बातमीदार) : मुंबईतील हरिहर पुत्र समाजाकडून खारघरमधील संजीवनी रुग्णालयाला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम स्वयंसेवी संस्था म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा शनिवारी (ता. २४) षण्मुखानंद सभागृहात पार पडला. हृदयविकार असलेल्या गरीब कुटुंबातील लहान बालकांचा हृदय संबंधित आजार असलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. मागील वर्षी खारघर, नवी मुंबई, छत्तीसगड आणि हरियाणातील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ या कार्यक्रमांतर्गत ३० हजार मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले. या शिवाय मागील वर्षापासून श्री सत्य साई संजीवनी हेल्थकेअर स्किल्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने मोफत आरोग्य सेवा कौशल्य प्रशिक्षणअंतर्गत १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील वैद्यकीय आणि सर्जिकल सहाय्यकांसह कुशल आरोग्य सेवा कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. याची दखल घेत मुंबईतील हरिहर पुत्र समाजाच्या वतीने खारघरमधील संजीवनी रुग्णालयाला सर्वोत्तम स्वयंसेवी संस्था म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT