उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने दोन सराईत दुचाकी चोरांना अटक करण्यात आली आहे. पथकाने तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अवघ्या एका कारवाईत तब्बल एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
युनिट कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल अशोक थोरवे व रामदास उगले यांना अरुण गुप्ता (वय २२) आणि किसन गुप्ता (वय २२) हे दोघे सराईत आरोपी २२ मे रोजी ऑर्डनन्स फॅक्टरी रहिवासी कॉलनी भागात येणार असल्याचे समजले. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या नेतृत्वाखाली गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंदू सावंत, रितेश वंजारी आणि संजय शेरमाळे सहभागी होते. यांनी तत्काळ सापळा रचला आणि वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने उल्हासनगर गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने एका महत्त्वपूर्ण कारवाईत दोन आरोपींना अटक करत तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे उल्हासनगर, अंबरनाथ आणि हिललाइन परिसरातील पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हे उघडकीस आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.