मुंबई

धोकादायक नाल्याच्या बांधकामास सुरवात

CD

अखेर स्वातंत्र्य सैनिकाच्या घराजवळील ‘त्या’ नाल्याच्या बांधकामास सुरुवात
उल्हासनगर, ता. २५ (बातमीदार) ः वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही धोकादायक नाला नव्याने बांधण्यात येत नसल्याने उल्हासनगरातील स्वातंत्र्य सैनिक सुभाष पाटील (वय ७६) यांनी उपोषण सुरू केले होते. शेवटी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी हमीनुसार नाल्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
सुभाष पाटील हे कॅम्प नंबर ४ मधील शिवनेरी हॉस्पिटलच्या मागे राहत असून, त्यांनी १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या घराच्या बाजूला एक मोठा नाला आहे. २००७ मध्ये बनविलेला हा नाला आता पडण्याच्या मार्गावर आला होता. गेल्या सात वर्षांपासून महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही तो नाला दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी उपोषणाचा मार्ग निवडला होता.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया हाताळण्यात आली असून, लवकरच नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही प्रक्रिया मोठी असून, काम तत्काळ सुरू केल्यावरच उपोषण सोडणार, असा पवित्रा घेत सुभाष पाटील यांनी पत्र घेण्यास नकार दिला होता. अखेर आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, शहर अभियंता हनुमंत खरात, कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता यांनी १० दिवसांत धोकादायक नाला बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार, असे लेखी हमीपत्र दिले होते. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT