डोळ्यातील १३ सेंमी वस्तू यशस्वीरीत्या काढली
जे. जे. रुग्णालयात चमत्कारिक शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वैद्यकीय कौशल्य आणि संघभावनेचा अप्रतिम नमुना दाखवत २५ वर्षीय रुग्ण नसीर खान (नाव बदललेले) यांना उजव्या डोळ्यात अपघातात खोलवर घुसलेल्या वस्तूमुळे जे. जे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.
ही वस्तू १३ सेंमी लांब, दोन सेंमी रुंद आणि ०.५ सेंमी जाडीची होती. रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टरांनी अतिदक्षतेने रुग्णाची स्थिती स्थिर केली. नेत्ररोगतज्ज्ञ, कान, नाक, घसा, सर्जन आणि प्लॅस्टिक सर्जन यांच्या बहुविभागीय पथकाने रुग्णाची सखोल तपासणी करून उपचारांचा सवोत्तम मार्ग ठरवला.
सखोल नियोजनानंतर आणि तपासणीनंतर गुंतागुंतीची एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यांमधील वस्तू काढण्यात आली. ही प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक पार पाडली गेली.
या शस्त्रक्रियेचे नेतृत्व प्रा. डॉ. श्रीनिवास चव्हाण कान, नाक, घसा विभागप्रमुख यांनी केले. ही शस्त्रक्रिया कान, नाक, घसा विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनीता बागे यांनी यशस्वीरीत्या केली. त्यांना वरिष्ठ निवासी डॉक्टर ऐश्वर्या, डॉ. रजत यांनी सहाय्य केले. भूलतज्ज्ञ पथकात सहयोगी प्राध्यापक डॉ. सुकृती आत्राम, वरिष्ठ निवासी डॉ. अनंत कृष्णन ए. यांचा यामध्ये समावेश होता.
नेत्र विभागातील डॉ. सुजाता चांदणे (नेत्र विभागप्रमुख) आणि डॉ. पूर्वा यांच्या नेतृत्वाखालील एक राखीव टीमदेखील आवश्यतेनुसार सल्ला देण्यासाठी उपस्थित होती. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.