मुंबई

अलविनाचे मारेकरी गजाआड

CD

अलवीनाचे मारेकरी गजाआड
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून आरोपींची धरपकड

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : उलवेतील २७ वर्षीय विवाहितेच्या हत्या प्रकरणातील फरार असलेले दोन्ही आरोपी अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुखबिर निर्मलसिंग राठिया (वय २४), गुरुप्रीत अवतार सिंग (२५) अशी या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून ताब्यात घेतले आहे. या हत्या प्रकरणातील मृत विवाहितेचा पती आणि त्याच्याकडून हत्येची सुपारी घेणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे.

उलवे सेक्टर-५ मध्ये राहणाऱ्या अलवीना अदमली खान (वय २७) या विवाहितेची रविवारी (ता. १८) मध्यरात्री भररस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा उलवे पोलिस आणि गुन्हे शाखेने तपास केला असता, मृत अलवीना व तिचा पती किशोरसिंग राजपूत या दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून तसेच घटस्फोट घेण्यावरून वाद झाल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याने अलवीनाची हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणाऱ्या अलिशा त्यागी हिला सहा लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले. तसेच अलिशा त्यागी व डिंपल या दोघींनी पंजाब येथून सुखबिर राठिया व गुरुप्रीत सिंग या दोघांना अलवीनाची हत्या करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपींनी अलवीनावर पाळत ठेवत तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी किशोरसिंग राजपूत, अलिशा त्यागी व डिंपल या तिघांना अटक केली होती. दरम्यान, अलवीनाची हत्या करणारे दोघे मारेकरी फरार झाले होते.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई
अलविना हत्या प्रकरणातील दोघे मारेकरी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर उलवे पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट-२ मधील पोलिस उपनिरीक्षक अभय शिंदे व संतोष पिलाणे यांचे संयुक्त पथक शनिवारी (ता. २४) नोएडा येथे रवाना झाले. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुखबिर राठिया व गुरुप्रीत सिंग या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी नोएडा गौतमनगर येथील न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून दोन्ही आरोपींना घेऊन ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT