मुंबई

रानडुकरांनी भरलेला टेम्पो जप्त

CD

शहापूर, ता. २५ (वार्ताहर) : जंगलातील रानडुकरांची शिकार करून त्यांची तस्करी करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या टेम्पोवर वनाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या वेळी टेम्पोमध्ये तब्बल १५ रानडुक्करे आढळून आली आहेत.
रविवारी मध्यरात्री २ वाजता वनअधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. यानुसार शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी, वनपाल संदीप केदार, वनरक्षक संतोष खंदारे, वनमजूर अनंता पडवळ आदींच्या पथकाने मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव येथे सापळा रचून रानडुकरांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. त्या वेळी या टेम्पोत तब्बल १५ रानडुक्करांचे पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली. ही रानडुक्करे कत्तलीसाठी नेण्यात येत होती. टेम्पोचालक व त्याच्या सहाय्यकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. या तस्करीचा मुख्य सूत्रधार राजेंद्र सखाराम पवार (वय ४८) याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT