शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादन देणाऱ्या बांबू शेतीकडे वळावे
भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : ‘बांबू या शाश्वत उत्पादन देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यात बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर करावी, यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास तत्पर आहे,’ असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोग समिती तथा बांबू मिशन अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. ते भिवंडी तालुक्यातील दाभाड व कवाड येथील आंब्याचा पाडा येथील बांबू लागवड प्रारंभाप्रसंगी बोलत होते. या वेळी तहसीलदार अभिजित खोले, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, दत्तात्रय कोलेकर यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ठाणे व पालघर जिल्ह्यात एक कोटी बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी पाशा पटेल हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवार (ता. २५) व सोमवार (ता. २६) ते भिवंडी व शहापूर येथे शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व समजावून देणार आहेत. या वेळी बांबू लागवडीचे महत्त्व विशद करीत असताना पाशा पटेल यांनी बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंचीही माहिती शेतकऱ्यांना दिली. बांबू लागवडीसाठी शासन अर्थसाह्य करणार असल्याने त्यामधून रोजगार हमीची कामेसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.