मुंबई

भिवंडी- कामण खड्डेमय रस्त्याविरोधात काँग्रेस आक्रमक

CD

भिवंडी-कामण खड्डेमय रस्त्याविरोधात काँग्रेस आक्रमक
बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
विरार, ता. २६ (बातमीदार) ः खड्डेमय रस्त्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चिंचोटी- भिवंडी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दोन तासांनंतर बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यांना जोडणारा भिवंडी-कामण-चिंचोटी हा प्रमुख महामार्ग मागील १० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु ठेकेदाराचा मनमानीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हतबलता यामुळे हा रस्ता आता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे कारखाने असून, त्या ठिकाणी कामाला येणाऱ्या कामगारांनाही खड्डेमय रस्त्यामुळे त्रास होत आहे. त्याची दखल घेत आज काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता चिंचोटी येथे रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमुळे काही काळ मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. हे आंदोलन जवळपास दोन तास सुरू होते. यादरम्यान बांधकाम विभागाचे उपअभियंता गितेव परदेशी यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्‍यांनी आंदोलन स्‍थगित करण्याची विनंती केली. तसेच न्यायालयाने १५ जूनपर्यंत खड्डे भरण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्‍यामुळे अखेर आंदोलकांनी १५ जूनपर्यंत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली, परंतु १५ जूनपर्यंत खड्डे दुरुस्त न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा ही या वेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला. आंदोलनात समीर वर्तक यांच्यासोबत काँग्रेसच्या व्यापारी विभागाचे प्रदेश सरचिटणीस के. अश्रफ, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल, निजाम खान, सचिव अमीर देशमुख, इब्राहिम बकाई, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव अश्रफ मलिक, सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव दिनेश कांबळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
...............
महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा
भिवंडी, ठाणे जिल्ह्यात व पालघरमध्ये ये-जा करणाऱ्या कामण-चिंचोटी-भिवंडी महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. हा महामार्गदेखील तितकाच महत्त्‍वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते, शिवाय छोटी-मोठी वाहतूकदेखील चोवीस तास सुरू असते, मात्र महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरून रात्रीचा प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आर्थिकदृट्या फायदेशीर आहे, व्यवसायाच्या दृष्टीनेदेखील त्‍याकडे पाहिले जाते, परंतु महामार्गाची दुरवस्‍था झाली असल्याने दळणवळणाची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे हा महामार्ग सुखकर प्रवासासाठी कधी वरदान ठरणार, याची प्रतीक्षा वाहनचालक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT