मुंबई

मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका

CD

तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : राज्यात अवकाळी पावसाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसत आहे, तसाच फटका नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील समुद्र किनारपट्टीलाही बसत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसह मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हंगाम बंद होण्यापूर्वीच मासेमारी बंद झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
मुंबई, तसेच आसपासच्या समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याची दाट शक्यता असल्यामुळे २५ मेपासूनच मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात न नेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी मासळी बाजारात मासे महागले आहेत. काही दिवस आधीच मासेमारी बंद केल्यामुळे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ताज्या मासळीची आवक घटून मासळीचे भाव वाढले आहे. नवी मुंबईतील खाडीकिनारी मिळणारी मासळी ही पावसामुळे कमी प्रमाणात मिळू लागली आहे. सध्याच्या पावसाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातीला बसला आहे. त्यात भाऊच्या धक्क्यावरून येणारी मासळीदेखील बंद झाल्याने खवय्यांना सुक्या मासळीवर ताव मारावा लागत आहे. पावसामुळे नवी मुंबई शहरातील मच्छीमारांनी आपल्या बोटी खाडीकिनारी नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे जी मासळी मिळेल, ती सोन्याच्या भावाने विकली जात आहे.
------------------
सध्याचे मासळीचे किलोचे भाव (रु.)
पॉपलेट १,८००
सुरमई १,५००
घोळ १,५००
हलवा १,२००
कोळंबी ८००
जिताडा ७००
बोंबील २०० (६ नग)
बांगडे २०० (५ नग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: आधी नाच मग पाणी देतो...! शिक्षकांचा आग्रह, पाण्यासाठी तहानलेली मुले पोहोचली रुग्णालयात, काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात

पुतीन ज्या देशात जातात, तिथे पोर्टेबल टॉयलेट घेऊन जातात....काय आहे यामागचं खरं कारण?

Tejashri Pradhan Divorce : माझ्या नवऱ्यासोबत काम करायला मिळालं हे माझं नशीब; पण एका अटीने...घटस्फोटाआधी काय म्हणाली तेजश्री प्रधान?

Ajit Pawar Video: ''माझ्यामुळेच तू आमदार झालास'', अजित पवारांची जाहीर कार्यक्रमात रोहित पवारांना कबुली

SCROLL FOR NEXT