मुंबई

कोसळधारांनी जिल्‍हा जलमय

CD

अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) : संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २५) वादळी वाऱ्यासह मोसमी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्‍यामुळे महाड, श्रीवर्धन, खालापूर, पेण तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले असून, सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, बागायतदार, व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. ‍विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह दोन दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे रस्ते खचण्याचेही प्रकार घडले आहेत. काही मार्गांवर झाडे पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. २४ तासांत रायगड जिल्ह्यात सरासरी १४०.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाची सरासरी ५७९ मिमी इतकी नोंद झाली आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसाची आतापर्यंतची ही सर्वाधिक सरासरी आहे.
रायगड जिल्ह्यात रविवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. मुरूड तालुक्यात सर्वाधिक ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याखालोखाल श्रीवर्धन ३०७ मिमी, म्हसळा ३०० मिमी इतकी नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. ९ मेपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर १७ मेपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळू लागल्या. २१ मेपासून पावसाचा जोर वाढला आहे.
आतापर्यंत मॉन्सून सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात केव्हाही पाऊस पडलेला नव्हता. पावसाच्या सरासरी तक्त्यातही मे महिन्याचा समावेश नव्हता. तो नव्याने करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर काम करीत असून, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ बैठक घेऊन सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
किल्ले रायगड मार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्याचा प्रवाह वाढल्‍याने रस्‍त्‍याला भगदाड पडले आहे. त्यामुळे रायगड मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक शंकर काळे यांनी दिली आहे. शहरातील एसटी थांबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

तोंडलीचे मांडव कोसळले
अलिबाग तालुक्यातील महाजने-बेलोशी पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नदीतून पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता, मात्र नदीला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत. जोरदार वारा तसेच पावसामुळे शेती पाण्याखाली गेली असून, तोंडलीचे मांडव कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

नेहुली येथील सिद्धेश्वर नदीला पूर आला. अलिबाग-पेण मार्गावरील राऊतवाडी येथील बंड्या मढवी यांच्या घरासमोरील मोठे चिंचेचे झाड कोसळल्‍याने काही वेळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अलिबाग शहरातील पीएनपी नगर, बायपास रोड, कोळीवाडा, मेघा टॉकीजचा परिसर या भागांत पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. ग्रामीण भागात रविवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड तालुक्यातील काही ग्रामीण भागातील घरे, गुरांचे गोठे यांचे नुकसान झाले आहे.

कर्जतमधील गावांचा संपर्क तुटला
कर्जतमधील उल्हास नदीवरील नेरळ-दहिवली येथील पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. रोह्यातील चणेरा-कोकबन मार्गावर रविवारी रात्री झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी तातडीने बचाव पथकाने मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली. हनुमान टेकडी मार्गावर दरड कोसळली. पेण-पाली मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खोपोली, रोहा, पाली, मुरूड बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : भारतात एस-४०० पेक्षाही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली विकसित होणार...पंतप्रधान मोदींकडून ‘सुदर्शन चक्र मिशन’ची घोषणा

Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

Latest Marathi News Live Updates : सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कल विपन्न सहायता समितीच्या परिसरात फडकावला तिरंगा

PM Modi's Independence Day 2025 Look: पांढरा कुर्ता अन् भगवा फेटा, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास लूकचे फोटो आले समोर

Independence Selfie Tips: स्वातंत्र्यदिनाला घरी, ऑफिसमध्ये तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? या स्पेशल टिप्समुळे तुमच्या सेल्फीवर होईल likes चा वर्षाव

SCROLL FOR NEXT