मुंबई

कामाविना काढले ८ कोटींचे बिल

CD

ठाणे, ता. २७ : ठाणे पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या मॉडेल रस्त्याचे आठ कोटींचे बिल कामाविनाच काढल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर केली. त्यामुळे महापालिकेच्या रस्त्याचे काम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
ठाणे पालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात जनसंवाद कार्यक्रम होते. या वेळी मनोरमा नगर येथील पालिकेचे आरोग्य केंद्रासह शाळा जमीनदोस्त करण्यात आली. ठाण्यातील सेंट्रल मैदान परिसराच्या आजूबाजूचा मॉडेल रस्ताचे काम सुरू आहे, मात्र या रस्त्याचे काम झालेले नसताना बिल काढण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या स्मार्ट भ्रष्टाचारावर आमदार आव्हाड यांनी टीका केली. या वेळी मनोरमा, आझाद नगर परिसरात जवळपास १० ते १५ हजार घरे आहेत. या ठिकाणी आरोग्य केंद्रासह शाळा जमीनदोस्त केले. याबाबत पालिका प्रशासनाने उत्तर दिलेले नाही. ठाणे पालिका क्षेत्रात नालेसफाई, गाळ काढणे, त्याचे खोलिकरण झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे कित्येक वर्ष नालेसफाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
..........................
अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
ठाणे महापालिका क्षेत्रातील बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहात आहेत. यावरून न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढले होते. असे असताना पालिका क्षेत्रात इमले उभे राहात आहेत. त्यामुळे आता पालिका अधिकाऱ्यांना न्यायालयाची भीती नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
.................................
पाणी का तुंबले?
मुंबईत शिवसेनेची सत्ता असताना, पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर उद्धव ठाकरे कुठे आहेत, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता. आता सरकार तुमचे आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर द्यावे, मुंबई का तुंबली, असा खोचक सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT