नालेसफाईच्या कामाची सुरेश म्हात्रेंकडून पाहणी
केडीएमसी आयुक्तांची भेट घेत केल्या विविध सूचना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः सध्या मॉन्सूनपूर्व पावसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली असली तरी मुख्य पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांनी कल्याण पश्चिमेतील चार प्रमुख मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामाची सोमवारी (ता. २६) पाहणी केली. ही पाहणी करून मग त्यांनी अभिनव गोयल यांची भेट घेत चर्चा केली.
यामध्ये येत्या काळात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेकडून कशाप्रकारे उपाययोजना केल्या जाणार, महापालिकेची तयारी काय आहे? नालेसफाई किती झालेली आहे? आदी महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता, तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संकटात अडकलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला मदत मागवण्यासाठी महापालिका अधिकारी किंवा नियंत्रण कक्षाचे फोन नंबर जारी केल्यास संबंधितांना तत्काळ मदत पोहोचवणे शक्य होईल, अशी सूचनाही सुरेश म्हात्रे यांनी या वेळी केडीएमसी आयुक्त गोयल यांना केली. त्यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून हेल्पलाइन नंबर लोकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचना केल्याचे दिसून आले.
दरम्यान, म्हात्रे यांनी आपल्या भेटीमध्ये दुर्गाडी चौकाजवळील, अंबिका नगर, जरीमरी आदी महत्त्वाच्या नाल्यांची पाहणी केली. या ठिकाणी नालेसफाईचे काम सुरू असले तरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन त्यावर कशाप्रकारे व्यवस्थापन आणि उपाय योजना करते हे त्याचवेळी दिसून येईल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.