मुंबई

कारचालकाच्या हत्येतील आरोपीला अटक

CD

कारचालकाच्या हत्येतील आरोपीला अटक
गुन्हे शाखेची २४ तासांत कारवाई
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील हायवेवरून जात असताना झीशान रफीक शेख या कारचालकाला दुचाकीस्वाराने बाचाबाचीतून चाकूहल्ला करून ठार केले होते. या घटनेनंतर दुचाकीस्‍वार पळून गेला होता. अखेर या हत्येतील आरोपी सुरज जयस्वाल याला विक्रोळीमधून अटक केली आहे.
मुंबई गुन्हे शाखा युनिट सातने ही कारवाई केली. ओव्हरटेकिंगवरून झालेल्या वादानंतर आरोपीने दुचाकीचालक झीशान शेखची चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. आता त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी हा खुनाचा गंभीर गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. रविवारी (ता. २५) दुपारी २ च्या सुमारास फिर्यादी व मृत व्यक्‍ती हे कारने जात असताना पंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हायवेवर एका अनोळखी दुचाकीस्वाराने गाडी चालवण्यावरून झीशान रफीक शेख याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेला चाकू काढून तो झीशान रफीक शेखच्या छातीत भोसकून त्याची हत्या केली होती. याबाबत मृतासोबत असलेल्या मित्राने पंतनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता.
मृत झीशान रफीक शेख विक्रोळीतील पार्कसाईट येथे राहतो. तो जुन्या कारच्या विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी दुपारी त्याच्या मित्रासोबत तो कारने कुर्ला येथे जात होता. त्‍या वेळी ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT