मुंबई

रोह्यात घर पडल्‍याने एक जखमी

CD

रोहा, ता. २७ (बातमीदार) ः तुफान वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने शहरी भागासह ग्रामीण भागात दाणादाण उडवली आहे. शहरातील बाजारपेठेसह दमखाडी भागातील गणेश नगर वस्तीत मध्यरात्री नाला तुडुंब भरल्‍याने मध्यरात्री अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्‍यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली, तर संभे गावात घर पडल्‍याने एक जण जखमी झाला.
कोलाडमधील संभे गावात घर कोसळून एक जण जखमी झाला, तर खारापटी गावातील श्री हनुमान मंदिरावर वीज कोसळल्‍याने मोठे नुकसान झाले. नागोठणेतील हेदवली गावात गोठा जमीनदोस्त होऊन एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. मंगळवारी पहाटे भिसे खिंडीत झाड कोसळल्‍याने काही वेळासाठी रोहा-नागोठणे मार्गावरील वाहतूक ठप्प होती. एकंदरीत तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्‍या मुसळधारेमुळे तालुक्‍यातील जनजीवन विस्‍कळित झाले आहे.
रोह्यात आठवडाभर पावसाने मुक्काम ठोकला आहे. वादळी वाऱ्यासहित कोसळणाऱ्या पावसामुळे कोलाड मार्गावरील संभे गावातील आदिवासीवाडीत सोमवारी (ता. २६) रोजी घर जमीनदोस्त झाल्याची घटना घडली. जमीनदोस्त झालेल्या घरात जाधव कुटुंबीय अडकल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाठी सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ संस्‍थेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. यात बळीराम जाधव (६०) या वृद्धाच्या डोक्याला दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, तर घरातील अन्य सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

वीज पडल्‍याने मंदिराचे नुकसान
रोहा-नागोठणे मार्गावरील खारापटी कोळीवाड्याच्या वेशीजवळ असलेल्या श्री हनुमान मंदिरावर रविवारी (ता. २६) सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घुमटाचे नुकसान झाले, तर भिसे खिंडीत मंगळवारी पहाटे ४च्या सुमारास झाड पडल्याने नागोठणेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती, मात्र रोहा पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मार्ग मोकळा केला.
रोहा ः संभे गावात वादळी वाऱ्यात घर जमीनदोस्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Horoscope : उद्या 15 मार्चचा दिवस घेऊन येणार पैसाच पैसा; गजलक्ष्मी योगाने 4 राशींचे नशीब उघडणार, मोठे संकट दूर होणार

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

SCROLL FOR NEXT