मुंबई

उपोषणकर्त्यांकडून सुरक्षारक्षकावर हल्ला

CD

अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : आनंदनगर एमआयडीसी येथील मिरॅकल कंपनी समोर दोन महिन्यांपासून कामावरून कमी केलेल्या कामगारांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांनी कंपनीच्या सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा हल्ला कंपनीत नाका कामगारांची बेकायदा भरती होत असल्याच्या गैरसमजातून करण्यात आला. याप्रकरणी आठ ते दहा उपोषणकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पूर्व आनंदनगर एमआयडीसीमधील मिरॅकल केबल कंपनीत दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. २६० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आल्याने हे उपोषण सुरू आहे. दरम्यान, कंपनीकडून बेकायदा नाका कामगारांची भरती होत असल्याचा गैरसमज उपोषणकर्त्यांना झाला होता. त्यातूनच कंपनीच्या प्रेमचंद पांडे (वय ५३) या सुरक्षारक्षकावर आठ ते दहा जणांनी हल्ला केला. यासंदर्भात दिलीप कुमार मुंडे, अंकुश, अक्षय आग्रे, सुरेंद्र सिंग, सुरेश मारुती सपकाळ, अखिलेश गौड, गणेश शिंदे, महेंद्र काते, अरुण सिंग, संजय कुमार, राजेंद्र पाल अशा १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. २६) रात्री साडेबाराच्या सुमारास भारत कंपनीसमोर सार्वजनिक रोडवर हा हल्ला करण्यात आला. रात्रीच्या अंधारात कंपनीत काही नाका कामगारांची भरती करून त्यांच्याकडून काम करून घेतले जात असल्याच्या गैरसमजातून हा हल्ला झाला. यामध्ये मिरॅकल कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बेदम चोप बसला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT