मुंबई

कळव्यात तिकिटासाठी प्रवाशांची पायपीट

CD

किरण घरत ः सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. २८ ः रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कळवा रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील तिकीट खिडकी बंद होत असल्याने प्रवाशांना जिना चढून पश्चिमेला फलाट क्रमांक १ च्या कोपऱ्यात असलेल्या तिकीट खिडकीवर जाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनातील अभावाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कळवा पूर्वेला शिवाजीनगर, आनंदनगर, भास्करनगर, पौंडपाडा, घोलाईनगर तसेच रेल्वे फाटकावर रेल्वे पूल झाल्याने कळवा पूर्व पश्चिम भाग जोडल्याने पारसिकनगर व रेतीबंदर भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवास करतात. या भागातून रात्री कामावर जाण्यासाठी कळवा पूर्वेला असणाऱ्या तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्री साडेआठ वाजताच ही खिडकी बंद केली जात असल्याने तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना मोठी दमछाक करावी लागत आहे. तर पश्चिमेला असलेल्या तिकीटघरात कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. मंगळवारी कळवा पूर्वेला राहणाऱ्या प्रवाशांना मुंबई येथे कामावर जाण्यासाठी कळवा पूर्वेला तिकीट खिडकी बंद असल्याने पश्चिमेला जावे लागले; परंतु पश्चिमेकडील खिडकीही काही काळ बंद होती. याबाबत विचारणा केली असता रेल्वे अपघातामुळे मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तासाभरासाठी ताटकळत उभे राहावे लागल्याने पूर्वेकडील तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
--------------------------------------
कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार
कळवा रेल्वे स्थानकातून दररोज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या रेल्वे स्थानकावर एखादा अपघात झाला अथवा अपघातातील मृतदेह उचलण्यासाठी हमाल नियुक्त नसल्याने कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना जावे लागते. त्यामुळे त्याचा त्रास इतर प्रवाशांना सहन करावा लागतो. तर फुकट्या प्रवाशांना दंड आकारून प्रामाणिक तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने बक्षीस योजना सुरू केली आहे. मात्र विनातिकीट प्रवास करून रेल्वेचे नुकसान टाळणाऱ्यांना वेळेवर तिकीट मिळत नसल्याची संतप्त भावना प्रवाशांमध्ये आहे.
-----------------------------------
प्रशासनाकडे पत्रव्यवहार
कळवा पूर्वेला तिकीट खिडकीवर कर्मचारी कमी असल्याने नवे कर्मचारी नियुक्त होईपर्यंत ही तिकीट खिडकी बंद ठेवावी लागते तसेच पश्चिमेला प्रवाशांचा जास्त ताण असल्याने कमी कर्मचाऱ्यांमुळे दोन शिफ्टमध्ये तिकीटघर सुरू ठेवावे लागते. त्यातच रेल्वे स्थानक परिसरात अथवा रेल्वेरुळावर एखादा अपघात झाल्यास कर्मचाऱ्यांना काम सोडून जावे लागते. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती कळवा रेल्वे स्थानक व्यवस्थापक पद्मजा गजरे यांनी दिली.
----------------------------------------
कळवा स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशातच रेल्वेस्थानकातील पूर्वेला असलेली तिकीट खिडकी रात्री बंद होत असल्याने प्रवाशांना पश्चिमेला जाऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आंदोलन करू.
- सिद्धेश देसाई, अध्यक्ष, पारसिक रेल्वे प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''पापाची हंडी आधीच फोडलीये, आता BMC मध्ये विकासाची हंडी लागेल अन् लोणी…; फडणवीस काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप

Video: ''सरपंच खाली उतरा'', चिमुकल्यांचा दंगा; रस्त्यासाठी गाडीवर चिखलफेक

अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी! भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात दिसणार अनोखी प्रेमकहाणी

फेक सॅलरी स्लीपवर नोकरी मिळाली, पण काम येईना; बॉस तरुणीने बँक स्टेटमेंट मागताच...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT