आपत्तीकाळात सतर्क राहा ः घुगे
ठाणे जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच आपत्तीकाळात तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेताना याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच, ठाणे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूरस्थितीवर दैनंदिन नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे पंचायत स्तरावरील तालुकास्तरीय कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्ष आणि जिल्हा परिषद ठाणे येथील साथरोग नियंत्रण कक्षासोबत नियमित संपर्कात राहण्याचे निर्देश दिले. पूरपरिस्थितीमुळे घर सोडलेल्या नागरिकांसाठी शाळा/ देवालये/ मंगल कार्यालयांमध्ये वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी आणि औषधोपचार द्यावे, यांसारख्या विविध उपाययोजना जिल्हा परिषदेकडून नियोजनबद्धपणे राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.
-------------------------------------------------------
लोकसंख्येनुसार पथके तैनात
गावांमध्ये आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावात दोन महिला, दोन पुरुष कर्मचारी आणि कमी लोकसंख्या असलेल्या गावात एक महिला आणि एक पुरुष कर्मचारी सेवा देणार आहेत. या पथकांकडे औषधसाठा आणि तपासणीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध केली जाणार आहे. तसेच, साथीचे आजार उद्भवू नये म्हणून औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
-------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.